24 October 2020

News Flash

पोलिसांसोबत आता स्वयंसेवकांची फौज

दक्षिण मुंबईतील दाट लोकवस्तीच्या पर्यायाने नियम धुडकावून लावण्याची मानसिकता असलेल्या भागात पोलिसांनी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली

बारावीमध्ये नापास झाल्यानंतरही न खचता मनोज कुमार यांनी संघर्षावर मात करत महाराष्ट्र कॅडरमध्ये आयपीएस झाले. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण मनोज कुमार यांच्या संघर्षाची स्टोरी पाहणार आहोत.

गर्दीला घरी पिटाळण्यासाठी वापर; दक्षिण मुंबईत ड्रोनद्वारे निगराणी

मुंबई : टाळेबंदी झुगारून विनाकारण रस्त्यांवर भटकणाऱ्या नागरिकांना आवरण्यासाठी, घरी पाठवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील काही विश्वसनीय तरुणांची फौज तयार केली आहे. बुधवारी पोलिसांव्यतिरिक्त स्वयंसेवकांची ही फौजही शहरातल्या विविध भागात गस्त घालताना, विनाकारण बाहेर पडलेल्या नागरिकांना घरी पिटाळताना दिसत होती.

दक्षिण मुंबईतील दाट लोकवस्तीच्या पर्यायाने नियम धुडकावून लावण्याची मानसिकता असलेल्या भागात पोलिसांनी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली. या ड्रोनमध्ये अद्ययावत कॅमेऱ्यासोबत उद्घोषणेचीही व्यवस्था आहे. त्यामुळे पोलिसांनी करोना संसर्गाबाबत केलेले प्रतिबंधात्मक उपाय, गर्दी टाळावी, काय करावे किंवा काय करू नये यांविषयी ध्वनिफीत तयार करून ती ड्रोनद्वारे या परिसरात ऐकवली. त्यासोबत पोलीस अधिकारीही गस्त घालताना घराबाहेर पडू नका, पोलिसांना सहकार्य करा, शासनाने जारी केलेल्या आदेशांचे पालन करा, अशी विनंती सातत्याने करताना आढळून येत होते.

पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गणेश विसर्जनाच्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत गर्दीचे नियमन महत्त्वाची जबाबदारी असते. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे विश्वासातील तरुणांना सोबत घेऊन ही जबाबदारी पार पाडली जाते. करोनामुळे जारी केलेल्या टाळेबंदीतही तशीच उपायोजना करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांची गस्त सतत सुरू असली तरी हद्दीतील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचणे, तिथेच थांबून राहणे शक्य नाही. त्यामऊहे रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना घरी पिटाळण्यासाठी किंवा गर्दीची माहिती पोलिसांना देण्यासाठी तरुणांना हाताशी घेतले आहे.

पोलिसांची थट्टा, अंगावर धावून जाण्याचे प्रकार

करोनाचा धोका टाळण्यासाठी एकीकडे बहुसंख्य नागरिक टाळेबंदी, जमावबंदी, वाहतूक बंदीबाबत गंभीर आहेत. आदेशांचे पालन करत आहेत. मात्र दुसरीकडे शहरातील काही भागांत मात्र चित्र पूर्णपणे विरुद्ध असल्याचा अनुभव पोलीस घेत आहेत. करोनावर अद्याप औषध न मिळाल्याने आता आपला देवच आपल्याला या धोक्यातून वाचवू शकेल. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा, देवाचा धावा करा, अशा सूचना धर्मगुरूच देत असल्याने प्रार्थनेसाठी संबंधीत समाजबांधव मोठय़ा संख्येने गर्दी करत आहेत. ती गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांचा प्रतिकार करत आहेत, पोलिसांच्या अंगावर धावून जात आहेत, बंदोबस्तावरील पोलिसांची थट्टा करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:43 am

Web Title: volunteer army with the police western mumbai akp 94
Next Stories
1 मालवाहू वाहनांवर स्टिकर्स
2 फिरत्या व्हेंटिलेटरचा पर्याय
3 ‘करोना’च्या खर्चासाठी मालमत्ता कराची वसुली
Just Now!
X