गेले पंधरा दिवस एकमेकांवर आरोपांची राळ उडवत झालेल्या प्रचारानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान होत आहे. युती-आघाडी खालसा झाल्याने राज्यात प्रथमच पंचरंगी निवडणूक होत आहे. त्यामुळे गेल्या दोन दशकांपेक्षा सर्वार्थाने ही निवडणूक वेगळी आहे. सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण चार हजार ११९ उमेदवार आपले भविष्य अजमावत आहेत. यातून नेमकी कोणाच्या हातात सत्ता सोपवायची याचा अधिकार राज्यातील आठ कोटी मतदार आज बजावणार आहेत. त्यामुळे कितीही कामात असाल, तरी आपला मताधिकार बजावाच. आजचा दिवस फक्त तुमचाच!

मतदानाचे लाइव्ह अपडेट्स ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे लाइव्ह अपडेट्स ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर (indianexpress-loksatta.go-vip.net) सकाळी आठ वाजल्यापासून वाचता येतील.
मतदान केल्याचा सेल्फी आम्हाला पाठवा.
तुम्ही मतदान केल्याचा सेल्फी ‘लोकसत्ता’च्या ट्विटर अकाउंटवर पाठवा. http://www.twitter.com/LoksattaLive
तुमचा फोटो @LoksattaLive असे मेन्शन करून ट्विटरवर अपलोड करा, आम्ही तो रिट्विट करू.