सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपामध्ये प्रवेश करत असताना काँग्रेसलाही एक झटका बसला आहे. वडाळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. येत्या ३१ जुलैला ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. कोळंबकर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागच्या काही महिन्यांपासून सुरु होती. काही महिन्यांपूर्वी कालिदास कोळंबकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा बॅनर लागले होते.

कोळंबकर यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेमधून झाली होती. सर्वसामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे. २००४ साली नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कट्टर राणेसमर्थक अशी त्यांची ओळख होती. सुरुवातीला राणेंबरोबर ज्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यापैकी बहुतांश नेते पुन्हा शिवसेनेत परतले. पण कोळंबकर राणेंसोबत एकनिष्ठ राहिले.

Vishal Patil filed two separate candidatures as Congress and Independent in sangli
सांगलीत विशाल पाटलांचे काँग्रेस व अपक्ष म्हणून दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप
MP Navneet Rana
…तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद
Former Congress MLA Namdev Usendi resigned alleging that money was the criterion for ticket distribution in Congress
काँग्रेसमध्ये तिकीट वाटपासाठी पैशांचा निकष, गंभीर आरोप करून काँग्रेसचे माजी आमदार उसेंडी यांचा राजीनामा

मागच्या काही महिन्यात मतदारसंघात त्यांनी लावलेल्या अनेक बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते. तेव्हापासून ते भाजपावासी होणार अशी चर्चा होती. शांत, संयमी स्वभावाच्या कालिदास कोळंबरकर यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. त्यामुळे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी आपली जागा कायम राखली. शिवसेना-भाजपाच्या युतीमुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण वडाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचीही ताकत आहे. शिवसेनेने या जागेवरील दावा कायम ठेवल्यास कोळंबकरांच्या अडचणी वाढू शकतात.