|| इंद्रायणी नार्वेकर

कचरा वर्गीकरण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करांतून सूट नाहीच

मुंबई : कचरा वर्गीकरण करून सुक्या व ओल्या कचऱ्याची व सांडपाण्याची विल्हेवाट लावणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात १५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची योजना पालिकेने २०१९ मध्ये आणली. त्याअंतर्गत सुमारे दोनशे सोसायट्या पात्र ठरलेल्या असल्या तरी अद्याप या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत मिळालेली नाही. टाळेबंदीमुळे ही सवलत देण्याची प्रक्रियाच रखडली आहे. येत्या एप्रिल महिन्यात तरी ही सवलत मिळणार का याकडे पात्र सोसायट्यांचे लक्ष लागले आहे.

पालिकेच्या कचराभूमीची क्षमता संपत चालल्यामुळे पालिकेने कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना आपल्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले. याचाच पुढचा भाग म्हणून पालिकेने ओला व सुका कचऱ्याची विल्हेवाट आपल्याच स्तरावर लावणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत देण्याचे ठरवले होते. ही सवलत देण्यासाठी काय निकष असावेत याकरिता घनकचरा विभागाने ऑक्टोबर २०१९ मध्ये धोरण आणले. ही सवलत याच २०१९-२० याच आर्थिक वर्षात लागू करण्याचे ठरले होते. पात्र सोसायट्यांना तसे कळवण्यात आले होते. मात्र त्यांना अद्याप एकही रुपयाची सवलत मिळालेली नाही.

ऑक्टोबर २०१९ पासून मुंबईतील काही मोजक्या सोसायट्यांनी कचरा वर्गीकरण व विल्हेवाटीसाठी आपल्या सोसायटीच्या आवारात यंत्रणा उभारली. पालिके ने गाजावाजा करून या पात्र इमारतींची नावेही जाहीर के ली होती. या सोसायट्यांना एप्रिल २०२०च्या मालमत्ता कर देयकात ही सवलत मिळणे अपेक्षित होते. मात्र मार्चपासून देशात करोनाने हातपाय पसरल्यामुळे टाळेबंदी लागू झाली. त्यातच पालिके च्या करनिर्धारण विभागातील कर्मचाऱ्यांना करोना कर्तव्यावर पाठवण्यात आले होते. त्यामुळे ही सवलत देण्याचे कामच रखडले. त्यातच करोनाकाळात अनेक सोसायट्यांना सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कोणीही मिळत नव्हते, तर काही सोसायट्यांनी या काळातही आपली यंत्रणा सुरू ठेवली होती. आता या सगळ्याचा विचार करून पालिके ला या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत द्यावी लागणार आहे.

दरम्यान,सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत देण्याची प्रक्रिया आम्ही आता सुरू के ली असल्याची माहिती कर निर्धारण आणि संकलक विभागाच्या साहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. सोसायट्यांनी विभाग कार्यालयांकडे अर्ज के ल्यानंतर घन कचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी  प्रमाणित के ल्यानंतर आम्ही ही सवलत त्यांना देणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.

पालिकेची सवलत योजना

  • इमारतीच्या आवारात निर्माण होणाऱ्या संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करणाऱ्या इमारतींना मालमत्ता करात ५ टक्के  सवलत.
  • सुका कचरा  पुनर्वापर करणाऱ्याला देऊन विल्हेवाट लावण्यासाठी ५ टक्के  सवलत.
  • सांडपाण्याचा पुनर्वापर करून ते पाणी स्वच्छतागृहासाठी वापरले जात असल्यास आणखी ५ टक्के  सवलत. 
  •  शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्यांना व सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात संपूर्ण १५ टक्के  सवलत.

दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील इन्फिनिटी टॉवर या सोसायटीला मुंबईतील पहिली पात्र सोसायटी म्हणून घोषित होण्याचा मान मिळाला. आमच्या सोसासटीने ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी साडेपाच लाखाचे यंत्र बसवले आहे. करोनाकाळातही कचऱ्याची विल्हेवाटीचे काम के ले होते व त्याचा दर महिन्यातचा अहवाल आम्ही पाठवतो. सोसायटी एक कोटीचा मालमत्ता कर भरत असून त्यात आम्हाला अपेक्षित असलेली सवलत गेल्या दोन वर्षात अद्याप मिळालेली नाही. -सुरेश देवरा, अध्यक्ष, इन्फिनिटी टॉवर