News Flash

अंधेरीत गँगस्टर संदीप गाडोली चकमकीत ठार

संदीप गाडोली हा गुरगाव येथील कुख्यात गँगस्टर होता.

अंधेरीत पोलिसांवर गोळीबार करणारा गँगस्टर संदीप गाडोली चकमकीत ठार झाला आहे. एमआयडीसी भागातील एका हॉटेलमध्ये ही चकमक झाली. संदीप गाडोली हा गुरगाव येथील कुख्यात गँगस्टर होता. त्याच्यावर हत्येच्या आरोपासह अनेक गुन्ह्यांची नोंद होती. तसेच, त्याच्यावर १.२५ लाखांचे इनामही जाहीर झाले होते.
संदीप हा मुंबईत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर हरयाणा पोलिसांच्या गुन्हे शाखाचे एक पथक येथे आले होते. तेव्हा तो एमआयडीसी भागातील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली. दरम्यान, पोलीस संदीपच्या रुमवर  अटक करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला.  त्यावेळी प्रत्यूत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संदीप ठार झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 3:05 pm

Web Title: wanted criminal sandeep gadoli killed in encounter at andheri
Next Stories
1 फॅशन डिझायनिंगचे धागे उलगडणार
2 इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज
3 प्रतिमा सुधारण्यासाठी प्रशासनात फेरबदल शक्य
Just Now!
X