एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी आमदार इ्म्पियाझ जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘भारत माता की जय’ म्हणण्याची सक्ती केली जाऊ नये, असे मत व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्याच्याशी सहमती दर्शवून निलंबन मागे घेणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
‘भारत माता की जय’ सक्तीने म्हटणार नाही, यासह काही वक्तव्ये केल्याच्या कारणावरुन पठाण यांना अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. आपले देशावर प्रेम असून राज्यघटनेवर श्रद्धा आहे, असे पठाण यांनी स्पष्ट केले आहे. पण तरीही निलंबन मागे घेण्यात आले नाही. संघाच्या भूमिकेचा भाजपकडून नेहमीच आदर केला जातो. त्यामुळे पठाण यांच्याबाबत मुख्यमंत्री कोणती भूमिका घेणार, हे लवकरच स्पष्ट होईल.