News Flash

जगभरात वारली चित्रकलेला प्रसिद्धी मिळवून देणारे जिव्या सोमा माशे यांचे निधन

जगला वारली चित्रकलेची ओळख करुन देणारे तसेच या कलेला प्रसिद्धी प्रसिद्धी मिळवून देणारे आदिवासी समाजातील कलाकार जिव्या सोमा माशे यांचे मंगळवारी सकाळी राहत्या घरी वद्धापकाळाने

जिव्या सोमा माशे

जगला वारली चित्रकलेची ओळख करुन देणारे तसेच या कलेला प्रसिद्धी प्रसिद्धी मिळवून देणारे आदिवासी समाजातील कलाकार जिव्या सोमा माशे यांचे मंगळवारी सकाळी राहत्या घरी वद्धापकाळाने निधन झाले, ते ८४ वर्षांचे होते. डहाणूपासून जवळ असलेले गंजद हे त्यांचे गाव आहे.

वारली चित्रकला ही आदिवासी कला टिकवून ठेवल्याबद्दाल तसेच तिला प्रसिद्धी मिळवून दिल्याबद्दल माशे यांना भारत सरकारने प्रतिष्ठीत पद्मश्री किताबाने गौरविले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

वारली समाजातील फक्त विवाहित महिलांना लग्न समारंभांमध्ये सुंदर अशी वारली चित्रे काढण्याची परवानगी होती. मात्र, माशे यांनी वयाच्या १३ व्या वर्षी ही परंपरा मोडण्याचे ठरवले आणि स्वतः ही चित्रे काढण्यास सुरुवात केली. या चित्रांमधून त्यांनी वारली समाजातील अनेक नृत्य प्रकार, तारपा सारखी वाद्ये या चित्रांमधून जगासमोर आणली. गेल्या ६६ वर्षांपासून ते सातत्याने ही चित्रे काढत होते, जगभरात त्यांची चित्रे प्रसिद्द होती.

१९७५मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी माशे यांची या कलेसाठी घेत असलेली मेहनत आणि हुशारी पाहून त्यांना पुरस्कारासाठी निवडले. त्यानंतर मोशे आपली वारली चित्रे घेऊन दिल्लीला गेले तेथे गेल्यानंतर त्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले.

त्यानंतर मोशे आपली वारली चित्रे घेऊन जगभरातील प्रदर्शनात भाग घेऊन आले आणि तिथल्या लोकांना आपल्या कलेची आणि संस्कृतीची ओळख करुन दिली. या कलेचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी मोशे यांनी वारली चित्रकलेच्या अनेक कार्यशाळाही घेतल्या.

मोशे यांची दोन्ही मुलेही आता या कलेत पारंगत झाली आहेत. यांपैकी एक मुलगा दरवर्षी तीन महिन्यांसाठी जपानमध्ये प्रदर्शनात आणि कार्यशाळेत ही चित्रकला शिकवण्यासाठी जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 3:10 am

Web Title: warli artist jivya soma mashe passes away 2
Next Stories
1 मतांच्या टक्केवारीत भाजपचा विजय नाही ; अशोक चव्हाण यांचा दावा
2 मुंबईतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेतीकडे कल
3 सायबर गुन्ह्यंचा तपास संथगती!
Just Now!
X