18 January 2021

News Flash

वाशिम दुर्घटनेतील दहा रुग्णांना दृष्टी!

या शस्त्रक्रियेदरम्यान निर्जतुंकीकरणाची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे २९ रुग्णांना अंधत्व आले.

जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात मोतिबिंदूची सदोष शस्त्रक्रिया केल्यामुळे अंधत्व आलेल्या २३ रुग्णांपैकी दहाजणांना जे.जे. रुग्णालयातील नेत्रविभागातील शस्त्रक्रियेनंतर दृष्टी मिळाली आहे. चार रुग्णांवर उद्या दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तर नऊ रुग्णांवर औषधोपचार सुरू असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता व नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात एक ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान एकूण १७४ रुग्णांवर मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. या शस्त्रक्रियेदरम्यान निर्जतुंकीकरणाची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे २९ रुग्णांना अंधत्व आले. जंतुसंसर्ग झाल्यानंतर त्याची तात्काळ माहिती वरिष्ठांना देऊन शस्त्रक्रियागृह बंद करून संपूर्ण र्निजतुकीकरण करणे आवश्यक होते. तथापि वाशिम येथील डॉक्टर प्रशांत चव्हाण व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेखा मेंडे यांनी योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले तर २३ रुग्णांना तातडीने शासनाच्या जे.जे. रुग्णालयातील नेत्र विभागात दाखल करण्यात आले. या रुग्णांवर विभागप्रमुख डॉ. रागिनी पारेख तसेच डॉ. प्रीतम सामंत यांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर यातील दहा रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळाल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. चा रुग्णांवर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान शासकीय रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे ज्या रुग्णांना आपले डोळे गमवावे लागले, त्यांना एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणी वाशिमचे आमदार राजेंद्र पटणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही या रुग्णांना एक लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2015 5:55 am

Web Title: washim patients getting treatment in j j hospital
Next Stories
1 रस्त्यांच्या अवाजवी आरक्षणाचा विळखा आता सैल होणार!
2 महाराष्ट्रात निवडणूक घेतल्यास शिवसेनेला स्वबळावर सत्ता!
3 पाच राज्यांमध्ये कोणाचे भाग्य उजळणार?
Just Now!
X