27 January 2021

News Flash

VIDEO: वर्दीतला देवमाणूस; महिला प्रवाशाचे वाचवले प्राण

धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करु नका

कुर्ला रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या कॉन्स्टेबलने एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवले. पनवेलला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना महिलेचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्म व लोकल ट्रेनमधील पोकळीत पडणार होती. मात्र इतक्यात प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या आरपीएफच्या कॉन्स्टेबलने महिलेला मागे खेचले आणि ती थोडक्यात बचावली.

मंगळवारी एक महिला प्रवासी कुर्ला स्थानकात पनवेलकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी आली. महिलेला ट्रेन पकडता आली. मात्र तिची बॅग प्लॅटफॉर्मवर पडली. बॅगेपायी महिला प्रवाशाने वेगात असलेल्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. उतरताना महिलेचा तोल गेल्याने ती प्लॅटफॉर्म व लोकल ट्रेनमधील पोकळीत पडणार होती. मात्र, इतक्यात तिथे उपस्थित अससेल्या कॉन्स्टेबलने महिलेला मागे खेचले व तिचा जीव वाचला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 9:08 am

Web Title: watch video rpf constable rescues woman passenger from run over by local train at kurla railway station
Next Stories
1 फेकन्युज : ‘ते’ छायाचित्र भलतेच!
2 उगाच बाहेरच्यांनी येऊन आम्हाला शिकवू नये, आफ्रिदीच्या वक्तव्यावर सचिनचा संताप
3 आम्ही काश्मीरमध्ये समोसे तळायला बसलेलो नाही, शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला
Just Now!
X