11 August 2020

News Flash

जलअभियंत्यांचा बंगला आता पालकमंत्र्यांना!

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी या बंगल्याचा ताबा घेतला

संग्रहित छायाचित्र

मुंबई महापालिकेच्या जल अभियंत्यांसाठी  मलबार हिल येथे बांधलेल्या बहुचर्चित बंगल्याचा ताबा सनदी अधिकारी प्रवीण दराडे यांनी सोडला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी या बंगल्याचा ताबा घेतला. १५ दिवसांत डागडुजी, रंगरंगोटी झाल्यानंतर ते या बंगल्यात वास्तव्यास जाणार आहेत.

मलबार हिल जलाशयावर लक्ष राहावे या उद्देशाने मलबार हिल येथे जल अभियंत्यांसाठी बंगला बांधण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सचिव पदावर असताना २०१४ मध्ये सनदी अधिकारी प्रवीण दराडे यांना हा बंगला वास्तव्यासाठी देण्यात आला होता. दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे महापौरांना वास्तव्यासाठी जल अभियंत्यांचा बंगला उपलब्ध करावा अशी जोरदार मागणी शिवसेनेकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर भायखळा येथील  उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यामध्ये महापौरांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर या वादावर पडदा पडला. दरम्यानच्या काळात दराडे यांची  पालिकेच्या अतिरिक्त आयक्तपदी बदली झाली.  महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दराडे यांची समाज कल्याण आयुक्त, पुणे येथे बदली झाली. त्यानंतर पालिके तील अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या आलिशान बंगल्यावर डोळा होता. मात्र सरकारने हा बंगला   पालकमंत्री शेख यांना देण्याचे ठरविले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:44 am

Web Title: water engineers bungalow now to guardian minister abn 97
Next Stories
1 वाहने परत पाठविण्याऐवजी जप्त
2 टाळेबंदीत गोंधळाची भर!
3 राज्यात २३ रक्तद्रव उपचार केंद्रे
Just Now!
X