बंदी असतानाही प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन पर्यटकांचा प्रवेश

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणी बाग) पेंग्विनच्या मृत्यूनंतर प्राणिसंग्रहालयाची दुरवस्था चव्हाटय़ावर आली असतानाच उद्यानातील पिण्याच्या पाण्याची वाहिनी फुटल्याने उद्यानात पर्यटनाकरिता आलेल्यांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

राणीच्या बागेच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या काही दिवसांपासून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. काम सुरू असतानाच एका पाण्याच्या वाहिनीला धक्का लागून ती सोमवारी सायंकाळी फुटली. त्यामुळे बागेत पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही. उद्यानातील सातपैकी सहा टाक्यांमध्ये पाण्याचा एकही थेंब नाही. पाण्याचा दुसरा काही स्रोत नसल्याने अनेक पर्यटक बंदी असतानाही सर्रास प्लास्टिकच्या बाटल्या उद्यानात नेत आहेत. ‘सध्या बागेत पिण्याच्या टाक्यांपैकी फक्त एकाच टाकीत पाणी शिल्लक आहे. त्यात कडक उन्हामुळे पर्यटकांना पाणी नेऊ नका, असे सांगायचे तरी कसे,’ असा सवाल येथील एका सुरक्षारक्षकाने केला.

 बंदी झुगारून खाद्यपदार्थ उद्यानात

बागेच्या प्रवेशद्वाराजवळ सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने बागेत दुसऱ्या मार्गाने प्रवेश देण्यात येतो. या प्रवेशद्वाराच्या तोंडावरच दुकांनाचे गाळे थाटलेले आहेत. उद्यानात प्लास्टिक व खाद्यपदार्थ नेण्यास बंदी असतानाही अनेक पर्यटक येथून पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या आणि खाद्यपदार्थ घेऊन उद्यानात प्रवेश करतात. अनेकजण उद्यानातच दिवाळीचा फराळ, वडापाव, आइस्क्रीम सारखे पदार्थ सुरक्षारक्षकांसमोर खात असतात. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

सोमवारी काम सुरू असताना अचानक जलवाहिनी फुटली होती, त्यामुळे सध्या ३-४ टाक्यांत पाणी नाही. पालिकेचे अभियंते याची पाहणी करून गेले असून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच पुन्हा पाणी उपलब्ध होईल.

डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान.