पावसाचे आगमन लांबल्याने आधीच चिंतेचे वातावरण असताना राज्यातील जलाशयांमधील पाण्याचा साठा आटू लागला आहे. मराठवाडय़ात तर एकूण क्षमतेच्या फक्त सहा टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या १८ टक्के साठा सध्या शिल्लक आहे.  
जल दु:स्थिती
कोकण (२७ टक्के), मराठवाडा (सहा टक्के), नागपूर (२३ टक्के), अमरावती (२८ टक्के), नाशिक (१८ टक्के), पुणे (१६ टक्के) पाण्याचा साठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसामध्ये (२९ टक्के), वैतरणा (१९ टक्के), मोडकसागर (३६ टक्के), तानसा (११ टक्के), विहार (४ टक्के), तुळशी (२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात १३ टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे.
मोठय़ा धरणांतील स्थिती- जायकवाडी (३ टक्के), विष्णुपुरी (४ टक्के), पेनगंगा (१३ टक्के), कोयना (२७ टक्के) साठा शिल्लक.