गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात काही जिल्ह्य़ांत दुष्काळ ओढावल्याने लोकांची तडफड होत असल्याने मुंबईतील हॉटेल संघटनांनी पाण्याचा जपून वापर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात संघटनेकडून हॉटेलचालकांना पाणी वाचवण्याबाबत काही सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय येत्या काही दिवसांत पाणी वाचवण्यासाठी हॉटेलमधील भिंतीवर पाणी जपून वापरण्यासंबंधी पत्रक चिकटवण्यात येणार आहे. यातून हजारो लिटर पाणी वाचवण्याचा संघटनेचा मानस असल्याचे आहार संघटनेकडून सांगण्यात आले.
शहर व उपनगरात छोटे-मोठे मिळून ८ हजारांहून अधिक हॉटेल्स आहेत. यात लाखो मुंबईकरांना दिवसांतून एकदा तरी भूक भागवण्यासाठी हॉटेलचा आधार घ्यावा लागतो. हॉटेलात दिल्या जाणाऱ्या पाण्याचे मोजमाप नसल्याने हजारो लिटर पाणी वापराविना वाया जात असल्याचे चित्र आहे. यावरच तोडगा काढत आहार संघटनेने पुढाकार घेतला आहे. यात हॉटेलचालकांना पाणी वाचवण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले आहेत. यात ग्राहकांना छोटय़ा ग्लासमधून पाणी द्यावे, एक ग्लास पाणी संपल्यानंतर ग्राहकांकडून जोपर्यंत पाण्याची मागणी केली जात नाही तोपर्यंत पाणी देऊ नये आणि सुरुवातीपासूनच अर्धा ग्लास पाणीच द्यावे, अशा काही आगळ्यावेगळ्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मुंबईत दिवसाला ३७५० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. यातील साधारण २० ते २५ टक्के पाणी नेमके कुठे जाते त्याचा पत्ता लागत नाही, तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांत एका ग्लासच्या पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते. याच धर्तीवर मुंबई व उपनगरातील हॉटेलचालकांना पाणी वाचवण्यासाठी उपाय सुचवण्यात आले आहेत.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे