मुंबईतील अनेक ठिकाणच्या पाणीटंचाई मुद्यावरून स्थायी समितीची सभा तहकूब

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : उन्हाळा अद्याप सुरू झालेला नसला तरी मुंबईच्या अनेक भागांत दररोज कुठे ना कुठे पाणीटंचाई सुरू आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव किं वा जलवाहिन्या वळविण्यासाठी दररोज कोणत्या तरी भागाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येतो किं वा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे मुंबईकरांना अप्रत्यक्षपणे पाणीकपातीला सामोरे जावे लागते आहे. मुंबईतील या अघोषित पाणीटंचाईविरोधात बुधवारी पुन्हा एकदा नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पाणीटंचाईच्या मुद्यावरून स्थायी समितीची सभा कोणतेही कामकाज न होता तहकू ब करण्यात आली.

गेल्या वर्षी चांगला पाऊस पडला व धरणे भरली होती. तरीही यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या विषयावरून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बैठक तहकू ब करण्याची सूचना मांडली. मुंबईला २४ तास पाणी देणार अशी घोषणा सत्ताधारी शिवसेनेने आणि पालिका प्रशासनाने के ली होती. मात्र मुंबईत अनेक ठिकाणी आतापासूनच दिवसभरातील ठरावीक वेळेतही पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा रवी राजा यांनी उपस्थित के ला. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. नगरसेवक निधीमधून  इमारतींमध्ये पर्जन्य जलसंचय योजना राबविण्यास व बोअरवेल खोदण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या राजूल पटेल यांनी के ली. तर अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे चाळीतील भांडणे पोलीस ठाण्यात पोहोचली असून म्हाडाच्या इमारतींना भूमिगत टाक्यांसाठी अनुदान द्यावे अशी मागणी संध्या दोषी यांनी के ली. म्हाडाच्या जमिनीवरील इमारतींना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने योजना आखावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी के ली.

दोन विभागात एक टँकर

२४ तास पाणी देण्याच्या प्रयोगाकरिता जे दोन विभाग निवडले होते, त्यात वांद्रे या भागाचा समावेश होता. मात्र वांद्रेमध्येही पाणीटंचाई सुरू असल्याचा मुद्दा काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झके रिया यांनी माडला. या भागात दर चार दिवसांनी एकदा तरी पाणीटंचाई निर्माण झालेली असते. वांद्रे पश्चिम व पूर्व अशा दोन विभागांसाठी एकच टँकर आहे, इतकी दयनीय अवस्था आहे, असेही ते म्हणाले. दरवर्षी ८ टक्के दराने पाणीपट्टी वाढवण्याची कायमस्वरूपी परवानगी स्थायी समितीने प्रशासनाला दिली आहे ती रद्द करावी अशीही मागणी झके रिया यांनी के ली. मुंबईकरांना सेवा दिली तरच करवाढ करता येईल, असाही मुद्दा त्यांनी मांडला.

चावीवाल्यावरही नियंत्रण हवे!

पाणीटंचाईवर नगरसेवकांनी अनेक उदाहरणे देत संशयही व्यक्त के ला. काही भागात पाणीपुरवठय़ाची चावी आठ वेळा फिरवली जाते तर काही ठिकाणी १२ वेळा याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त के ली. एका विभागात एक दिवस पाणी नसते, दुसऱ्या दिवशी अन्य विभागात पाणी नसते, असाही मुद्दा नगरसेवकांनी मांडला. समान वाटपासाठी चावीवाल्यावरही नियंत्रण ठेवा, अशी सूचना यावेळी के ली.

स्थायी समिती अध्यक्षांच्या घरी सात दिवस पाणी नाही

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या घरात सात दिवस पाणी नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देताच बैठकीत एकच हशा पिकला. भायखळ्यात सध्या पाणीटंचाई असून आपल्या विभागातही व इमारतीत पाणी येत नसल्याचे ते म्हणाले. पाणी चोरीचे प्रमाण वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाण्याची कमतरता नाही

पाणीपुरवठा कमी होत असला तरी मुंबईत पाण्याची कमतरता नाही, असे यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट के ले. मात्र वितरण व्यवस्थेत दोष असल्याचेही त्यांनी यावेळी मान्य के ले. त्यामुळे पुढील काही दिवस पाणी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी फिरून दोष नक्की कु ठे आहेत हे तपासावे, अशी सूचना त्यांनी यावेळी के ली. तसेच पाणीपुरवठय़ाचे जाळे अनेक वर्षे जुने असल्यामुळे ते जीर्ण आहेत. तसेच विकासकामांमध्येही जलवाहिन्या फु टत असल्यामुळे पाणीपुरवठय़ावर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. त्याकरिता अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करा, असाही सल्ला त्यांनी जल अभियंता विभागाला दिला. त्याचबरोबर लोकांना पाणी जपून वापरण्यासाठी ‘पाणी शिक्षण’ द्यावे, अशीही सूचना त्यांनी केली.