जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येत असल्यामुळे मुंबईमधील सात विभाग कार्यालयांच्या हद्दीत बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.  तर १२ नोव्हेंबर रोजी या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जल विभागाने तातडीने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील कुलाबा (ए), भायखळा (ई), सॅण्डहर्स्ट रोड (बी), माटुंगा (एफ-उत्तर), परळ (एफ दक्षिण), तर पूर्व उपनगरांतील चेंबूर पूर्व (एम-पूर्व) आणि चेंबूर पश्चिम (एम-पश्चिम) अशा सात विभाग कार्यालयांच्या हद्दीत ११ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी १० नोव्हेंबर रोजी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

सुमन नगर जंक्शनजवळ १८०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होईल.

त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी सात विभागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर १२ नोव्हेंबर रोजी संबंधित विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. ए विभागातील नेव्हल डॉक आऊटलेट झोन, सेंट जॉर्ज रुग्णालय, ई विभागातील डॉकयार्ड, हाथीबाग व हुसैन पटेल मार्ग आणि माऊंट रोड, जे. जे. रुग्णालय, बी विभागात डोंगरी ए परिमंडळ, वाडी बंदर,  सेंट्रल रेल्वे विभाग, बीपीटी परिसर, एफ-उत्तरमधील कोकरी आगर, अ‍ॅन्टोप हिल, वडाळा, प्रवेशद्वार क्रमांक ४, कोरबा मिठागर, बीपीटी परिसर, एफ-दक्षिणमधील परळ गाव, शिवडी (पश्चिम आणि पूर्व), रुग्णालय परिसर, काळे वाडी, एम-पश्चिममधील साईबाबा नगर, शेल कॉलनी, सिद्धार्थ कॉलनी, पोस्टल  कॉलनी, एचपीसीएल, बीपीसीएल, आरसीएफ, बीपीटी, टाटा पावर, रामकृष्ण चेंबूरकर मार्गावरील मारवाली चर्च, आंबापाडा, माहुल गाव, म्हैसूर कॉलनी, वाशी गाव, माहुल पीएपी, मुकु ंद नगर एसआरए, लक्ष्मी नगर, कलेक्टर कॉलनी, सिंधी सोसायटी, चेंबूर कॅ म्प, चेंबूर नाका ते सुमन नगरमधील शीव-ट्रॉम्बे मार्गालगतचा भाग, एम-पूर्वमधील ट्रॉम्बे निन्मस्तर जलाशयावरील गिडवाणी मार्ग, चेंबूरकर मार्ग आदी भागांत बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही.