News Flash

चुनाभट्टी स्थानकातील पाणी ओसरण्यास १५ तास

पावसाने पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिके च्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल केली.

स्थानक परिसराची रेल्वे, महापालिके च्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

मुंबई : पावसाने पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिके च्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल केली. मध्य रेल्वेवर ठिकठिकाणी साचलेले पाणी ओसरल्यानंतर दहा तासांनी मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण आणि हार्बरवरील सीएसएमटी ते गोरेगाव लोकल सेवा सुरळीत झाली. परंतु चुनाभट्टी रेल्वे स्थानकातील पाणी ओसरण्यास तब्बल पंधरा तास लागले. पाणी ओसरण्यास लागलेला वेळ पाहता गुरुवारी मध्य रेल्वे व मुंबई पालिकेकडून चुनाभट्टी स्थानक व हद्दीतील पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शीव ते कु र्ला स्थानकादरम्यान रुळांवर पाणी साचले. त्यामुळे सकाळी ९.५० वाजता सीएसएमटी ते कु र्ला उपनगरी सेवा बंद करण्यात आली. परंतु पावसाचा वाढलेला जोर पाहता सीएसएमटी ते ठाणे लोकलही रद्द के ल्या. याचबरोबरच चुनाभट्टी आणि किंग्ज सर्कल सर्कल ते वडाळादरम्यानही रुळांवर बरेच पाणी आले. चुनाभट्टी स्थानकातील साचलेल्या पाण्यामुळे सकाळी १०.२० वाजता सीएसएमटी ते वाशी लोकल सेवा बंदच ठेवण्यात आली. उदंचन यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याचा निचरा के ला जात होता, तर पाणी साचलेल्या अन्य स्थानकांतही पाणी उपसले जात होते. साधारण रात्री पावणेआठ ते सव्वाआठ दरम्यान मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याणदरम्यानची आणि हार्बरवरील सीएसएमटी ते गोरेगावची सेवा सुरू झाली. परंतु सीएसएमटी ते वाशी सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला. हार्बरवरील वडाळा, कु र्ला पट्टय़ात काही प्रमाणात रुळांवर पाणी होते. ते हळूहळू ओसरत होते. परंतु चुनाभट्टी रेल्वे स्थानक व हद्दीतील पाणीच ओसरत नव्हते. रात्री रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा उपसा केला जात असतानाही परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे लोकल बंदच ठेवावी लागली. सातत्याने पाण्याचा उपसा के ल्यानंतर अखेर मध्यरात्री १.१० वाजता रुळांवरील पाणी कमी झाले व त्यानंतर रुळ सुरक्षित असल्याची पाहणी करून हार्बर लोकल काही प्रवाशांसाठी सोडण्यात आल्या.

कामे पारदर्शक

मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर पावसाळापूर्व कामे करताना मोठय़ा प्रमाणात नालेसफाई के ली जाते. ही सफाई करण्यासाठी पालिकेकडून गेल्या १२ वर्षांत ३० कोटी रुपये निधी रेल्वेला दिल्याचे माहिती अधिकारातून समोर आले. परंतु यंदा पहिल्याच पावसात रेल्वे रुळांवर पाणी साचले. त्यामुळे खर्च के लेल्या निधीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याबाबत रेल्वे हद्दीतील नाल्यांची सफाई पावसाळ्याआधी दोन वेळा के ली जात असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. प्रचंड पाऊस व समुद्राच्या भरतीची वेळ त्यावेळी साचलेल्या पाण्याचा निचरा लवकर होत नाही, असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. रेल्वे रुळांजवळ प्रशासन जास्त क्षमतेचे पंप लावून पाण्याचा निचरा करते. तसेच, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून पाण्याला मार्ग मोकळा करून देते. मागील काही वर्षांपासून रूळावर पाणी साचू नये यासाठी मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांच्या काळात रेल्वे रूळ  ५० सेंटीमीटरने  वर उचलले आहेत. शिवाय रेल्वे हद्दीत केलेल्या सफाईची पाहणी महापालिका व रेल्वेचे अधिकारी यांच्याकडून संयुक्तरीत्या करत असतात. नालेसफाईच्या कामाचा विस्तृत अहवालही बनवला जातो आणि ही कामे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात येतात, असे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.

कारणांचा शोध

चुनाभट्टी स्थानक हद्दीत रुळांवर दोन फु टांपर्यंत पाणी होते. याच स्थानकात सर्वाधिक पाणी साचले होते. त्यामुळे हे पाणी साचण्याचे कारण, ते ओसरण्यास झालेला उशीर इत्यादी कारणांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी सकाळपासून रेल्वेचे अधिकारी व मुंबई पालिका कर्मचाऱ्यांनी पाहणी के ली. हे काम दिवसभर सुरू होते. त्याचा अहवाल तयार के ला जाणार आहे. पहिल्याच पावसात चुनाभट्टी स्थानकात मोठय़ा प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे या स्थानकावरही अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:41 am

Web Title: water to evaporate chunabhatti station mumbai heavy rainfall ssh 93
Next Stories
1 मुंबईत ४८५ अतिधोकादायक इमारती
2 कांदे महागले
3 खारफुटींच्या संवर्धनासाठी लाखो रुपयांचा खर्च
Just Now!
X