30 September 2020

News Flash

मुंबईचा सागरी किनारा रस्ता ठाण्यापर्यंत

विस्तृत प्रकल्प अहवालासाठी सल्लागाराची नेमणूक

विस्तारित रस्ता मार्वे-भाईंदरमार्गे घोडबंदरपर्यंत; विस्तृत प्रकल्प अहवालासाठी सल्लागाराची नेमणूक

मुंबई महानगरपालिकेने प्रस्तावित केलेला नरिमन पॉइंट ते कांदिवली हा सागरी किनारा रस्ता ठाण्यापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. हा विस्तारित मार्ग मार्वे-भाईंदर-घोडबंदर रोड असा ३५ किमीचा असणार आहे. यामुळे ठाणे परिसरातील नागरिकांना पश्चिम उपनगरांमध्ये थेट प्रवास करणे शक्य होणार आहे. गुरुवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मे. स्तुप-दाराशॉ यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीची नियुक्ती केली आहे.

गुरुवारी प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत या कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे विस्तारित सागरी किनारा मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेला सागरी किनारा मार्ग नरिमन पॉइंट ते कांदिवली असा असणार आहे. या मार्गामध्ये एमएमआरडीएने मार्वे येथून भाईंदरमाग्रे घोडबंदर रोड येथे ३५ किमीचा रस्ता प्रस्तावित केला आहे. या मार्गामुळे ठाणे ते नरिमन पॉइंट हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने गुरुवारी वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ मार्गासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. याचबरोबर वांद्रे-कुर्ला संकुल आणि प्राधिकरण क्षेत्रातील विविध रस्ते प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामुळे निर्णयांमुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसर मुंबई शहराशी जोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या बैठकीत मेट्रो-४ प्रकल्पाचे संकल्पचित्र, खरेदीकरिता साहाय्य करणे, बांधकाम व्यवस्थापन, देखरेख, एकत्रित प्रणाली, चाचणी आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मे. डी.बी. इंजिनीअरिंग अँड कन्सलटिंग आणि ल्युइस बर्जर कन्सल्टिंग या कंपन्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे आता मेट्रो-४च्या कामाला गती मिळणार आहे.

या कामाचा फायदा विस्तारित ठाणे शहरातील रहिवाशांना होणार असून त्यांचा मुंबईचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकणार आहे. याचबरोबर या बैठकीत वांद्रे-कुर्ला संकुल आणि सांताक्रूझ-चेंबूर जंक्शन येथील परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बीकेसी येथील भारत डायमंड ब्रोर्स. ते वाकोला जंक्शन येथे २.२ किमी लांबीचा पूल बांधण्याचा प्रस्तावित आहे. याकरिता मे. नीरज सिमेंट स्ट्रक्चरल लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर समितीने ३३.८ किमीच्या ठाणे-बेलापूर ते राष्ट्रीय महामार्ग -४ या रस्ते प्रकल्पास मान्यता दिली आहे. हा रस्ता बांधण्याकरिता मे. एसएमसी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. हा रस्ता ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या परिसरांना मुंबई शहराशी जोडण्यास उपयुक्त ठरणार आहे.

प्राधिकरणातर्फे समग्र विकासाचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा विकास करत असताना आम्ही मुंबई महानगर प्रदेशाकरिता मेट्रो आणि रस्ते प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत.   – यू.पी.एस. मदान, आयुक्त, एमएमआरडीए

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 12:08 am

Web Title: water transport in mumbai
Next Stories
1 कत्तलीची परवानगी नसलेल्या बकऱ्यांची कुर्बानी नाही?
2 पुढील दोन दिवसांमध्ये मुंबई आणि लगतच्या पट्ट्यात अतिवृष्टीचा इशारा
3 एमआयडीसी जमीन घोटाळाप्रकरणी सुभाष देसाईंची चौकशी अप्पर सचिवांमार्फत
Just Now!
X