News Flash

जाणून घ्या.. दहावी आणि बारावीनंतरचा मार्ग यशाचा

दहावी-बारावीनंतर करायचे काय, करिअर निवडायचे ते कोणते आणि कसे हा जितका महत्त्वाचा, तितकाच गहन असा प्रश्न. त्याच्या नेमके योग्य उत्तर मिळाले की यशाचे दरवाजे

| May 24, 2015 04:06 am

जाणून घ्या.. दहावी आणि बारावीनंतरचा मार्ग यशाचा

दहावी-बारावीनंतर करायचे काय, करिअर निवडायचे ते कोणते आणि कसे  हा जितका महत्त्वाचा, तितकाच गहन असा प्रश्न. त्याच्या नेमके योग्य उत्तर मिळाले की यशाचे दरवाजे उघडण्यास वेळ लागत नाही. त्यासाठी आवश्यकता असते ती योग्य मार्गदर्शनाची. हे लक्षात घेऊनच लोकसत्ताने ‘मार्ग यशाचा’ या खास परिसंवादाचे आयोजन केले आहे.
दहावी-बारावीनंतरत्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांची आणि करिअर निवडीच्या तंत्राची सविस्तर ओळख करून देणारा हा विद्यालंकार प्रस्तुत ‘लोकसत्ता- मार्ग यशाचा’ परिसंवाद रवींद्र नाटय़ मंदिर येथे येत्या २९ व ३० मे रोजी होणार आहे. आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाचे उद्घाटन २९ मे रोजी राज्याचे शालेय व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. डोंबिवली नागरी सहकारी बँक या कार्यक्रमाची ‘बँकिंग पार्टनर’ आहे.   
असा असेल परिसंवाद..
या परिसंवादाच्या सुरुवातीच्या सत्रात पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या करिअरविषयक विभागाच्या प्रमुख नीलिमा आपटे ‘करिअर निवडताना..’ या विषयावर मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे ‘करिअरमधील सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व आणि विकास’ या विषयावर कॉर्पोरेट ट्रेनर गौरी खेर यांचे व्याख्यान होईल, तर ‘दहावी-बारावीनंतरचे अभ्यासक्रम आणि करिअरसंधी’ या विषयावर ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील. या परिसंवादासोबतच शैक्षणिक प्रदर्शनही होईल. विविध शिक्षणसंस्थांची माहिती त्यात मांडली जाईल. २९ आणि ३० मे या दोन्ही दिवशी वक्ते आणि त्यांच्या वक्तव्याचा विषय सारखाच असेल. यापैकी कुठल्याही एके दिवशी उपस्थित राहण्यासाठी प्रतिव्यक्ती ५० रु. प्रवेशशुल्क आकारले जाईल. यात उपस्थितांना लंच बॉक्सही देण्यात येईल.
प्रवेशिकांसाठी..
सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका पुढील ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध आहेत- रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी, मुंबई. विद्यालंकार हाऊस, प्लॉट क्र. ५६, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर (पूर्व). अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२- ६७४४०३६९/३४७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2015 4:06 am

Web Title: way to success for 10th 2th students
टॅग : Way To Success
Next Stories
1 ‘मॅगी’ अहवालाच्या प्रतीक्षेत
2 मेगाब्लॉकच्या वेळापत्रकात बदल
3 मान्सून थबकलेलाच
Just Now!
X