News Flash

हे तर आणीबाणी सारखं, माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ल्याचा निषेध – जावडेकर

ही माध्यमांसोबत वागण्याची पद्धत नाही, असं देखील म्हणाले आहेत.

हे तर आणीबाणी सारखं, माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ल्याचा निषेध – जावडेकर
संग्रहीत

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. यावरून आता भाजपा व राज्य सरकारमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. भाजपा नेते व केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

”महाराष्ट्रात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. ही माध्यमांसोबत वागण्याची पद्धत नाही. ही घटना आम्हाला आणीबाणीच्या काळाची आठवण करून देत आहे, त्या दिवसांमध्ये माध्यमांना अशाप्रकारची वागणूक दिली जात होती.” असं प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

आणखी वाचा- “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण…,” अर्णब गोस्वामी अटकेवरुन फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

तर, अटकेची कारवाई करतेवेळी अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा रिपब्लिककडून करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.

आणखी वाचा- मोदींमुळे नाही तर राज्यात उद्धव यांच्या सूडबुद्धीमुळे आणीबाणी; अर्णब अटकेवरुन भाजपा नेत्याचा टोला

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 9:21 am

Web Title: we condemn the attack on press freedom prakash javadekar msr 87
Next Stories
1 रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
2 फराळालाही महागाईची लागण!
3 संसर्गामुळे अचानक बहिरेपणाचा त्रास
Just Now!
X