20 October 2020

News Flash

कर्नाड यांच्या निधनामुळे कला, साहित्य क्षेत्रातील महान व्यक्त‍िमत्त्वाचा अस्त: मुख्यमंत्री

विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार व नागरी सन्मानांनी झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचे महत्व विशद करणारा

ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या निधनाने एक महान रंगकर्मी हरपला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तसेच, साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व आपण गमावले, असे म्हणुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केली आहे.ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या निधनाने एक महान रंगकर्मी हरपला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तसेच, साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व आपण गमावले, असे म्हणुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, श्री. कर्नाड यांचा साहित्य, चित्रपट, रंगभूमी यासह वैचारिक क्षेत्रातही समर्थपणे वावर होता. ज्ञानपीठ, कालिदास सन्मान, साहित्य अकादमी, संगीत अकादमी यांच्यासह विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार व नागरी सन्मानांनी झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचे महत्व विशद करणारा आहे. एक महान रंगकर्मी म्हणून त्यांचे भारतीय नाट्यक्षेत्रातील योगदान सदैव स्मरणीय असेल. ययाति, हयवदन, तुघलक, नागमंडल यासारखी अनेक प्रसिध्द नाटकं आण‍ि उत्सव या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणूनही त्यांची विशेष ओळख होती. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपटातील त्यांची भूमिका रसिकांच्या सदैव स्मरणात राहिल. त्यांचे लेखन विचारप्रवाहित करणारे होते. भारतीय नाट्यक्षेत्राची पुनर्रचना करणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रणी घेतले जाते. भारतीय पौराणिक कथांना समकालीन प्रश्नांशी जोडत त्यावर ते आपल्या लेखनीद्वारे समर्पक भाष्य करत.मराठी चित्रपटसृष्टी – रंगभूमी तसेच साहित्य क्षेत्राशीही त्यांचा निकटचा संबंध होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 1:24 pm

Web Title: we loss a great artist due to girish karnad death msr 87
Next Stories
1 VIDEO : मुंबईतील रस्त्यांवर चालत्या गाडीत स्टंटबाजी
2 रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार
3 रिक्षा चालकांचा ९ जुलैपासून संप
Just Now!
X