अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेल्या बोटींपैकी एका स्पीड बोटीला बुधवारी संध्याकाळी अपघात झाला. गिरगावच्या सुमद्रात खडकाला धडकून ही बोट बुडाली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी दुर्घटनेची चौकशी होणार असल्याचे जाहीर केले.

मोठी दुर्घटना घडू शकली असती पण वेळेवर अन्य बोटी मदतीसाठी पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान बेपत्ता असलेल्या सिद्धेश पवार यांचा शोध सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.