‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा‘ या ‘ लोकसत्ता‘ तर्फे  राबविण्यात येणाऱ्या उपक्र मात आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार आहेत. आज ( शनिवारी ) सायंकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होईल. त्यांना प्रश्न विचारण्यासाठी  वाचकांना http://tiny.cc/Loksatta-Maharashtra60 या लिंकवर क्लिक करून सहभागी होता येईल.

फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळातराज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. जलयुक्त शिवार, मुंबई, पुणे, नागपूरमधील पायाभूत सुविधांची कामे, नागपूर- मुंबई समृद्धी मार्ग असे काही महत्त्वाचे निर्णय त्यांच्या कारकीर्दीत झाले. मुंबई, पुणे, नागपूरमधील मेट्रो प्रकल्प  फडणवीस यांच्या काळातच मार्गी लागले.