मुंबई : सुप्रसिद्ध लोककलावंत सुरखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी अन्य काही राजकीय पक्षांतील कार्यकत्र्यांनीही पक्षात प्रवेश के ला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात सुरखा पुणेकर आणि देवयानी बेंद्रे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनीषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
What Ram Satpute Said?
“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यानंतरही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपरा सुरू ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जसे सर्व जाती-धर्मातील लोक आहेत. त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहिजे, ही शरद पवार यांची भूमिका आहे, असे अजित पवार म्हणाले.