पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी, ३० डिसेंबर रोजी अभियांत्रिकी कामानिमित्त पाच तासांचा मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावर माहीम जंक्शन ते अंधेरी या हार्बर मार्गावर दोन्ही दिशेने सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या अंधेरी उपनगरी गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
हार्बर मार्गावर वडाळा रोड ते वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० दरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला दरम्यानची हार्बर मार्गावरील वाहतूक मेन लाइनवर वळविण्यात आली आहे. ही वाहतूक जलद मार्गावरून करण्यात येणार असून या गाडय़ा करीरोड आणि चिंचपोकळी येथे थांबणार नाही. हार्बर मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.