News Flash

पश्चिम रेल्वेची लोकल सेवा पूर्ववत

कांदिवली आणि बोरीवली स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडीमुळे चर्चगेटच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेटच्या दिशेने येणारी विस्कळीत झालेली वाहतूक पर्ववत झाली आहे. कांदिवली आणि बोरीवली स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे गुरूवारी सकाळी चर्चगेटच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशीराने सुरू होत्या. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर वाहतूक विस्कळीत झाल्याच्या तासाभरानंतर ती पूर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2015 8:44 am

Web Title: western line locals running late
टॅग : Railway
Next Stories
1 असहिष्णुतेच्या वक्तव्यावर शाहरुखचा माफीनामा
2 ‘स्मार्ट सिटी’ला विरोधच – उद्धव
3 महिला स्वच्छतागृहांसाठी महिन्याची मुदत ; रेल्वे स्थानकांवरील गैरसोयींबाबत उच्च न्यायालयाचे कठोर ताशेरे
Just Now!
X