पश्चिम रेल्वेकडून चाचपणी सुरू

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या वातानुकू लित लोकल गाडीला अद्यापही थंड प्रतिसाद मिळत असून दिवसाची साधारण सहा हजार प्रवासी क्षमता असताना प्रत्यक्षात पाच महिन्यांत मिळून ७ हजारांच्या आसपास तिकीटविक्री झाली आहे. त्यामुळे आता जलद मार्गावर धावत असलेल्या गाडीला धीम्या मार्गावर चालवून काही प्रतिसाद मिळतो का याची चाचपणी पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकू लित लोकल तीन वर्षांपूर्वी सुरू झाली. ही सेवा सुरु करताना सामान्य लोकलच्या १२ फे ऱ्या कमी करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जलद मार्गावर वातानुकू लित लोकल चालवताना मोजक्याच स्थानकात थांबा देण्यात आला. अनेक कारणांमुळे या सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. टाळेबंदीत ही सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. टाळेबंदी शिथिलीकरणात पश्चिम रेल्वेने १५ ऑक्टोबरपासून पुन्हा वातानुकू लित लोकल प्रवाशांच्या सेवेत आणली. दिवसाला या सेवेच्या बारा फे ऱ्या होतात. सेवेत येताच सुरुवातीच्या ३० दिवसांत फक्त ३४१ तिकीट व ३१५ पासची विक्री झाली होती. फे ब्रुवारीपर्यंत एकू ण ६ हजार ८६१ तिकिटांची आणि १० हजार ७८० पास विक्री झाली आहे. १ मार्चला २६४ तिकिटे आणि २६२ पास प्रवाशांनी घेतल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले. आतापर्यंत एकू ण सप्टेंबरपासून वातानुकू लित लोकल सेवेत येताच एकू ण ९१ लाख १८ हजार रुपये महसूल रेल्वेला मिळाला आहे.

तिकीट विक्री व महसूल पाहता तो फार कमी आहे. पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांनी वातानुकू लित लोकलविषयी बोलताना त्याला प्रवाशांकडून फार कमी प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न के ले जात आहेत. सध्या ही लोकल जलद मार्गावर सुरू आहे. धिम्या मार्गावरही वातानुकू लित लोकल चालवण्याचा विचार आहे. त्याआधी मार्ग व अन्य तांत्रिक बाबी तपासल्या जात असल्याचे कन्सल म्हणाले. प्रत्येक स्थानकात लोकल थांबल्यास कमी अंतरावरील प्रवासीही मिळू शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे.

प्रतिसाद कमीच

२५ डिसेंबर २०१७ ला पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकू लित लोकल बोरिवली ते चर्चगेट धावली. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकू ण सात वातानुकू लित लोकल असून सध्या एकच लोकल सेवेत आहे. एका लोकलची किं मत ५२ कोटी रुपये आहे. वातानुकूलित लोकल गाडीची एकूण प्रवासी क्षमता ५ हजार ९६४ आहे. यात १ हजार २८ प्रवासी आसनक्षमता व ४ हजार ९३६ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील. मात्र मिळत असलेला प्रतिसाद पाहता तो कमीच आहे. त्यामुळे उर्वरित वातानुकू लित लोकल गाडय़ांचे काय, असा प्रश्न आहे.

मध्य रेल्वेचा प्रस्ताव मागेच

मध्य रेल्वेवर सध्या धिम्या मार्गावर वातानुकू लित लोकल धावत आहे. जलद मार्गावरही वातानुकू लित लोकल चालवण्याचा प्रस्ताव साधारण एक महिन्यापूर्वी तयार करण्यात आला होता. परंतु हा प्रस्तावही मागे पडला आहे.