07 March 2021

News Flash

‘स्वयंचलित दरवाजांनी’ गर्दीची वेळ चुकवलीच

चर्चगेट ते बोरिवली या दरम्यान रविवारी मोजक्या प्रवाशांसह स्वयंचलित दरवाजांच्या गाडीने चाचणी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे मिरवले असले,

| March 17, 2015 12:10 pm

चर्चगेट ते बोरिवली या दरम्यान रविवारी मोजक्या प्रवाशांसह स्वयंचलित दरवाजांच्या गाडीने चाचणी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे मिरवले असले, तरी सोमवारी या गाडीने मुख्य परीक्षेला दांडीच मारली. परीक्षेच्या वेळी लहान मुले आजाराचे कारण देतात, त्याचप्रमाणे या गाडीने देखभाल दुरुस्तीचे कारण पुढे करत सोमवारचा बहुतांश वेळ मुंबई सेंट्रल येथील कारखान्यातच काढला. ही गाडी रात्री उशिरा पश्चिम रेल्वेवर चालली, मात्र तोपर्यंत प्रथम दर्जाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांची गर्दी रोडावली होती.
धावत्या लोकलमधून प्रवासी खाली पडून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वेने स्वयंचलित दरवाजांची गाडी तयार केली. या गाडीच्या मधल्या प्रथम दर्जाच्या महिला डब्याचे दोन दरवाजे स्वयंचलित आहेत. पश्चिम रेल्वेवर ही गाडी रविवारी दुपारी पहिल्यांदा प्रवाशांना घेऊन धावली. मात्र रविवारी या गाडीत काही महिला पत्रकार, महिला सुरक्षा रक्षक आणि महिला रेल्वे कर्मचारी यांनीच प्रवास केला. या गाडीचे स्वयंचलित दरवाजे योग्य प्रकारे उघडबंद होत असून गाडी चालण्यास कोणतीही अडचण नसल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे सोमवारी ऐन गर्दीच्या वेळी हे स्वयंचलित दरवाजे कशी कामगिरी करतात, याकडे सर्वाचे लक्ष होते.
मात्र सोमवारी या गाडीने चक्क या मुख्य परीक्षेला दांडी मारली. दर दीड वर्षांनी प्रत्येक गाडीची देखभाल दुरुस्ती होते. त्यानंतर या गाडीची तपासणीही होते. मात्र सदर गाडीची तपासणी होणे बाकी होते. ही तपासणी सोमवारी करण्यात आली. त्यासाठी ही गाडी मुंबई सेंट्रल येथील कार्यशाळेतच होती. त्यामुळे सोमवारी गर्दीच्या वेळी या स्वयंचलित दरवाजांची चाचणी होऊ शकली नाहीच. परिणामी हे स्वयंचलित दरवाजे ऐन गर्दीच्या वेळी कसे काम करतात, याचा अंदाज आता मंगळवार किंवा बुधवारपासूनच येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:10 pm

Web Title: western railway conducts trials of automatic door closing system in local trains
Next Stories
1 भाजपचे शिवसेनेवर शरसंधान
2 पनवेलजवळील जमीन व्यवहाराशी ‘यूएफओ मूव्हीज’चा संबंध नाही
3 ८० टक्के मेट्रो प्रकल्पग्रस्तांना दुप्पट जागा
Just Now!
X