पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने लाखो नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन कामावर जाण्याच्या गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

विलेपार्ले ते सांताक्रूझ दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. दादर, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाडयांची रांग लागली आहे. बिघाड दुरुस्त व्हायला अर्धा ते पाऊणसात लागेल असे रेल्वेकडून सांगण्यात आले.