News Flash

पश्चिम रेल्वे विस्कळीत

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेला ओव्हरहेड वायरमधील तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. अंधेरी आणि जोगेश्वरी या दोन स्थानकांदरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरवर दुसरीच वायर

| July 2, 2013 02:46 am

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेला ओव्हरहेड वायरमधील तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. अंधेरी आणि जोगेश्वरी या दोन स्थानकांदरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरवर दुसरीच वायर पडल्याने झालेल्या गोंधळात पश्चिम रेल्वेच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी-अंधेरी या स्थानकांदरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर दुपारी सव्वाच्या सुमारास ओव्हरहेड वायरवर एक दुसरीच वायर पडली. त्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला आणि चर्चगेटच्या दिशेने जाणारी गाडी जागीच थांबली. त्यानंतर या गाडय़ा अप जलद मार्गावरून चर्चगेटच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. दुपारी पावणेदोनच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 2:46 am

Web Title: western railway fragmented
टॅग : Local Train,Railway
Next Stories
1 मार्वे समुद्रात बुडालेल्या तीन विद्यार्थाचे मृतदेह मिळाले
2 तळोजा तुरुंगात केकच्या डब्यातून पिस्तूल?
3 ‘पीपल्स’प्रकरणी आठवले आक्रमक
Just Now!
X