News Flash

चर्चगेट लोकलमध्ये महिलांची हाणामारी, महिलेचा घेतला चावा

रेल्वे प्रवाशांनी महिलेला मारहाण करणाऱ्या तिघींना ताब्यात घेतले आहे.

डहाणू-चर्चगेट लोकलमध्ये महिलांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना ताजी असतानाच, आज, शनिवारी पुन्हा एकदा चर्चगेट लोकलमध्ये महिला प्रवाशांची दादागिरी पाहायला मिळाली. लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून चार महिलांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. या प्रकरणी वसई पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतले.

प्रभा यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. त्याचवेळी दरवाजात उभ्या असलेल्या महिलांपैकी तिघींशी तिचा वाद झाला. या महिलांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर या महिलांनी प्रभा यांच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर प्रभा यांनी धाडस दाखवून या तीन महिलांना भाईंदर रेल्वे स्थानकात उतरवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या तिघींनाही ताब्यात घेतले असून, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी डहाणूहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात विरारमधील महिला प्रवाशांनी प्रवेश करू नये, म्हणून दरवाजेच आतून बंद करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर विरारच्या प्रवाशांना डब्यात प्रवेश मिळाला होता. त्यापूर्वीही डहाणू लोकलमध्ये प्रवास करण्यावरून पुरुष डब्यात वसई-विरार आणि भार्इंदरमधील प्रवाशांना विरोध झाला होता. त्यावरून हाणामारीही झाली होती. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी डहाणू, पालघर परिसरातील १४ प्रवाशांना लोकलमधून पकडून त्यांच्यावर कारवाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 4:08 pm

Web Title: western railway ladies commuters beaten one lady commuter in churchgate train
Next Stories
1 मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल- राज ठाकरे
2 झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या दहा केंद्रांवर NIAचे छापे
3 नोटाबंदीमुळे सार्‍या देशालाच ‘शहीद’ घोषित करण्याची वेळ येऊ नये- शिवसेना
Just Now!
X