गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. वसई रोड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल गाड़्यांची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.
गुरुवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना ऐन गर्दीच्या वेळी मनस्तापाचा सामना करावा लागला. सकाळी वसई रोड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि याचा फटका दोन्ही दिशेकडील मार्गांना बसला. पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांची वाहतूक गुरुवारी सकाळी सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.
Due to signal failure at Vasai Road all Suburban local trains are running late by 10 to 15min.
— DRM WR MumbaiCentral (@drmbct) March 28, 2019
पश्चिम रेल्वेने ट्विटरवरुनही याबाबत माहिती दिली आहे. लोकल गाड्यांची वाहतूक उशिराने सुरु असल्याने अनेक प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यास उशिर झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 28, 2019 10:28 am