News Flash

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील एक झाड कापण्याचे काम संध्याकाळी रेल्वे प्रशासनानेच हाती घेतले. हे झाड खूपच वाकल्याने कोणताही अपघात होण्याआधी ते कापण्याचा

| July 8, 2013 08:27 am

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील एक झाड कापण्याचे काम संध्याकाळी रेल्वे प्रशासनानेच हाती घेतले. हे झाड खूपच वाकल्याने कोणताही अपघात होण्याआधी ते कापण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हिड यांनी दिली. या कामामुळे बोरिवलीकडे जाणाऱया धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या बोरिवलीकडे जाणाऱया धिम्या मार्गावरील गाड्यांची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

संग्रहित छायाचित्र

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 8:27 am

Web Title: western railway transport is fragmented
Next Stories
1 अकरावीच्या ६ ० हजार जागा रिक्त! पुढील आठवडय़ात संस्थास्तरावर
2 महाविद्यालयांमध्ये मोबाइल बंदी ?
3 व्यापाऱ्यांचा पुन्हा एल्गार
Just Now!
X