04 March 2021

News Flash

पश्चिम उपनगरांमधील रेल्वे फाटकांना कायमचे ‘कुलूप’!

अंधेरी-जोगेश्वरी यांदरम्यान एक रेल्वे फाटक आहे. या फाटकातून यापूर्वी वाहनेही जात होती.

पश्चिम रेल्वेवरील बहुतांश उपनगरीय सेवांना ‘लेटमार्क’ लावणाऱ्या अंधेरी-जोगेश्वरी यांदरम्यानच्या रेल्वे फाटकाला १५ ऑक्टोबरपासून कायमचे टाळे लागणार आहे. त्याशिवाय ओशिवरा येथे पादचारी पुलाचे काम महापालिका करत असून महिन्याअखेपर्यंत हे काम पूर्ण करून हे फाटकही बंद करण्यात येणार आहे. यामुळे अपघातांची संख्या कमी होणार असून पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ांचा वक्तशीरपणा सुधारणार आहे.

अंधेरी-जोगेश्वरी यांदरम्यान एक रेल्वे फाटक आहे. या फाटकातून यापूर्वी वाहनेही जात होती. मात्र आता पश्चिम रेल्वेने वाहने बंद करून हे फाटक केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवले होते.   या फाटकामुळे पश्चिम रेल्वेच्या वक्तशीरपणाला फटका बसत होता. या फाटकांमुळे दर दिवशी २० सेवांचा वक्तशीरपणा बिघडत असे. ही गोष्ट लक्षात घेऊन येथे पादचारी पूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे हे फाटक १५ ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार आहे.

या फाटकाशिवाय नव्याने तयार होत असलेल्या ओशिवरा रेल्वे स्थानकाला लागूनही एक रेल्वे फाटक आहे. या फाटकातून वाहनांची वाहतूक थांबवण्यासाठी रेल्वे आणि महापालिका यांनी स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला उड्डाणपूल बांधला. आता या फाटकाच्या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू असून महापालिकेतर्फे होणारे हे काम ऑक्टोबरअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रेल्वे फाटकालाही टाळे लागणार आहे. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासून पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारणार आहे.

 

अंधेरी-जोगेश्वरी यांदरम्यानचे फाटक शनिवारपासून बंद

ओशिवरा स्थानकाजवळील रेल्वे फाटकही बंद करण्याच्या हालचाली

उपनगरीय गाडय़ांच्या वक्तशीरपणात सुधारणा होण्याची शक्यता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:49 am

Web Title: western railways to close all unmanned level crossing gates
Next Stories
1 दंड भरू पण, कचरा करूच
2 ताडी भेसळयुक्तच!
3 स्वच्छतेच्या जनआंदोलनामुळे हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र अव्वल
Just Now!
X