आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडं कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अशाप्रकारे मुंबईमधील विशिष्ट भागामध्ये जमावबंदीचे कलम लागू करण्याची ही मागील चार महिन्यातील चौथी घटना आहे. जाणून घेऊयात हे कलम नक्की आहे तरी काय आणि कधी व कशासाठी लागू करण्यात आले होते मुंबईमधील वेगवेगळ्या भागांमध्ये कलम १४४…

कलम १४४ आहे तरी काय? कोण लागू करू शकते हे कलम?

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
koradi police station, Nagpur, case registered, Sexual abuse, minor girl
धक्कादायक! नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

> कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम आहे. हे कलम अश्या ठिकाणी लागू केले जाते जिथे मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली जाण्याची वा दंगलीची संभावना असेल. हे कलम लागू असणाऱ्या परिसरामध्ये चार किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते.  जमावबंदीला इंग्रजीमध्ये Curfew असेसुद्धा म्हणतात.

> जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात.

> यात वर नमूद अधिकारी फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम १३४ अन्वये नोटीस पाठवून एखाद्या ठरविक व्यक्तीला काही खास कृती करण्यापासून प्रतिबंध घालण्याचे निर्देश देऊ शकतात. मात्र यासाठी काही अटी आणि नियम आहेत. अशी नोटीस एका खास भागात राहणाऱ्या व्यक्तींवर किंवा लोकांवर व त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांवर सुद्धा बजावली जाऊ शकते.

> कोणत्याही भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जमावबंदीचा आदेश लागू करता येत नाही. एखाद्या ठिकाणी दोन महिने जमावबंदी लागू केल्यानंतर ती संपुष्टात आल्यावर पुन्हा नव्याने जमावबंदीचा आदेश काढता येतो. पण जर राज्य सरकारला वाटले नागरिकांच्या जीविताला धोका व आरोग्याला धोका असेल व दंगलीची संभावना असेल असे वाटले तर ही जमावबंदी ६ महिन्यांपर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.

मुंबईत चार महिन्यात लागू झालेली जमावबंदी

१० जुलै 

कर्नाटकातील राजकीय नाटयाचा खेळ आता मुंबईत सुरु झाल्यानंतर पवईमधील काही भागांमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी.के.शिवकुमार सरकार वाचवण्यासाठी आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. शिवकुमार यांनी पवईच्या रेनायसन्स हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. याच हॉटेलमध्ये काँग्रेस-जेडीएसचे बंडखोर आमदार थांबल्याने शिवकुमार यांचे बुकिंग हॉटेलकडून रद्द करण्यात आले. शिवकुमार यांना बंडखोर आमदारांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले होते. रेनायसन्स हॉटेल असलेल्या पवईमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे कलम लागू करण्यात आले होते. शांतता भंग होऊ नये म्हणून ९ ते १२ जुलैसाठी जमावबंदी लागू करण्यात आले होते.

२२ ऑगस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमधील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयामध्ये साठेआठ तास चौकशी झाली. या दिवशी मुंबईमधील काही भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते. यामध्ये मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाणे , दादर पोलीस ठाणे आणि मरीन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीचा समावेश होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यालयाबाहेर आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

२७ सप्टेंबर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात २७ सप्टेंबर स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकंडून कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली होती. दुपारी पावणे दोनच्या सुमारास खुद्द शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय स्थगित केल्याची माहिती दिली होती.

५ ऑक्टोबर

आरे येथील मेट्रोच्या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने राज्य सरकार आणि मुंबई रेल मेट्रो कॉर्पोरेशनला दिलासा मिळाला. न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी रात्री आठपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली. आरेतील अनेक झाडे इलेक्ट्रिक करवतीने झाडे तोडली गेली. यासंदर्भात माहिती मिळताच शुक्रवारी रात्रीच अनेक पर्यावरण प्रेमी आरे येथील कारशेडच्या ठिकाणी जमू लागले. आरे कारशेडच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी रात्रीपासून सुरु झालेले आंदोलन हे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतही सुरुच होते. अखेर पोलिसांनी आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू केले. येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून चारपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.