News Flash

‘अणुऊर्जेला विरोध करण्याचे कारण काय?’

अणुऊर्जेला पर्याय नसून त्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्याला विरोध करण्याचे कारणच काय? असा प्रश्न ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी उपस्थित केला.

| August 11, 2015 12:05 pm

अणुऊर्जेला पर्याय नसून त्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्याला विरोध करण्याचे कारणच काय? असा प्रश्न ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी उपस्थित केला. फ्रान्समध्ये जवळपास ८५ टक्के अणुऊर्जा वापरली जाते. अणुऊर्जा अपघातांची भीती व्यर्थ आहे, देशात इतर अपघातही घडतातच, मग अपघातांचा बागुलबुवा करणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी अणुऊर्जेचा वापर आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या ‘मल्हार २०१५’ परिषदेच्या निमित्ताने नारायण मूर्तीनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एका प्रश्नावर ते म्हणाले,  सध्या संशोधनासाठी पसे दिले जात नाहीत, अशी ओरड केली जाते. मात्र संशोधनासाठी शिक्षकांनी पुढे येण्याची गरज आहे. आज इन्फोसिससारख्या अनेक बडय़ा कंपन्यांमध्ये संशोधनाला प्राधान्य दिले जाते, त्यामुळे संशोधनासाठी या कंपन्यांकडे शिक्षकांनी जावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2015 12:05 pm

Web Title: what is the reason to oppose nuclear power says narayana murthy
Next Stories
1 दुचाकीच्या अपघातात राजकुमार हिरानी गंभीर जखमी, लीलावतीत उपचार सुरू
2 उद्धव-राज एकत्र आल्याच्या बातम्या खोटय़ा!
3 राधे माँ त्रिशूळ घेऊन विमानात, प्रवासी संतप्त
Just Now!
X