महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. नेमक्या आणि अचूक शब्दांचा वापर करत सभा जिंकण्यामध्ये त्यांचा कोणी हात धरु शकत नाही. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या याच कौशल्याची चुणूक पुन्हा दिसून आली. प्रेक्षकांमधील एकाने त्यांना अमित ठाकरे यांनी राजकारणात सक्रीय होण्यासाठी कोणाकडून धडे घ्यावेत, असा प्रश्न विचारला असता. राज यांनी मी काय घरात गोट्या खेळतो काय, असा अभिनय करत उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे सहभागी झाले होते. त्यावेळी प्रेक्षकांमधून एकाने त्यांना अमित ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला. अमित ठाकरे हे राजकारणात सक्रिय होत आहेत. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारण, समाजकारणाचे धडे घेतले आहेत. अमित यांनी कोणाकडून राजकारणाचे व समाजकारणाचे धडे घ्यावेत, असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न राज यांना करण्यात आला. त्यावेळी राज यांनी क्षणाचाही वेळ न दवडता मी घरात काय गोट्या खेळतो का, असा प्रतिप्रश्न केला. त्यांच्या या उत्तराने संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What should i play in the house says raj thackeray when asking about amit thackeray
First published on: 17-12-2018 at 21:50 IST