महाराष्ट्राची ताकद, गुण-दोष शोधून अनेक विषयांचे वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून मंथन करून एका अकादमीच्या सविस्तर सर्व्हेनंतर आजं इथं पोहोचलो, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची बहुप्रतिक्षीत ब्लू प्रिंट गुरूवारी सादर केली.
 मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रम राज यांनी आपल्या ब्लू प्रिंटबद्दल विविध टप्प्यात सविस्तर माहिती दिली आणि पक्षाने तयार केलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा मांडणाऱया mnsblueprint.org संकेतस्थळाचेही राज यांनी अनावरण केले. 
अनेकांनी मनसेच्या ब्लू प्रिंटची थट्टा केली परंतु, प्रत्येक गोष्टीला टायमिंग असतो. मला २५ तारखेला ब्लू प्रिंट सादर करायची होती त्यात निवडणुकामध्ये आल्या असेही राज यावेळी म्हणाले. यासोबत निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ब्लू प्रिंट नाही असेही ते पुढे म्हणाले.  घटस्थापनेला कुणाचा घटस्फोट होत असला, तरी त्याचा उल्लेख आज करणार नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांचाही थोडक्यात समाचार घेतला.

कार्यक्रमातील राज यांच्या भाषणाचे लाईव्ह अपडेट्स-
* अनेकांनी माझ्या ब्लू प्रिंटची चेष्टा केली
* आजचा दिवस राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी नाही, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी
* प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. माझ्या ब्लू प्रिंटचा मुहूर्त आज आहे
* संकेतस्थळाद्वारे मनसेचा महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा जाहीर होणार
* वीज-पाणी-रस्त्यापलिकडे आपण कधी जाणार
* मी माझी कोणासोबत बरोबरी करत नाही