News Flash

‘मागास’ स्मार्टफोनमधून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक हद्दपार!

स्मार्टफोनच्या बाजारात ‘अँड्रॉइड’ आणि ‘आयओएस’ या दोन ऑपरेटिंग प्रणालीचा दबदबा आहे.

डिसेंबरनंतर मोबाइलमधील ‘सपोर्ट’ काढण्याचा अ‍ॅप कंपन्यांचा निर्णय, नवा फोन घेणे अनिवार्य

स्मार्टफोनच्या बाजारात ‘अँड्रॉइड’ आणि ‘आयओएस’ या दोन ऑपरेटिंग प्रणालीचा दबदबा आहे. पण यातील जुन्या आणि कमी मागणी असलेल्या ऑपरेटिंग प्रणालीवरील फोनवरून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक ही दोन्ही अ‍ॅप डिसेंबरनंतर हद्दपार होणार आहेत. कंपन्यांनी आधीच या निर्णयाचे संकेत दिले होते, आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. यासंदर्भात कंपनीकडून सर्व वापरकर्त्यांना संदेश पाठविण्यास सुरुवात झाली असून वापरकर्त्यांना जर हे अ‍ॅप वापरायचे असतील तर नवा फोन घ्यावा लागणार आहे. यामध्ये ब्लॅकबेरी, ब्लॅकबेरी १०, नोकिया एस ४०, नोकिया सिम्बियन एस ६०, अँड्रॉइड २.१ व २.२ आणि विंडोज फोन ७.१ या ऑपरेटिंग प्रणालीचा समावेश आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या दोन्ही अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे अ‍ॅपवर मोठय़ा प्रमाणावर माहितीसाठा उपलब्ध आहे. हा साठा सुरक्षित करण्यासाठी कंपनीतर्फे विविध प्रयत्न केले जातात. जुन्या प्रणालींवर हे बदल शक्य नसल्याने मोबाइलमधील ‘सपोर्ट’ काढावा लागणार आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणतीही ऑपरेटिंग प्रणाली वापरणाऱ्यांनी अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोजच्या अद्ययावत आवृत्ती असलेल्या ऑपरेटिंग प्रणालीचे फोन घ्यावेत, असा सल्ला व्हॉट्सअ‍ॅपतर्फे वापरकर्त्यांना देण्यात आला आहे.

ब्लॅकबेरीचा अँड्रॉइड फोन

ब्लॅकबेरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ब्लॅकबेरी क्लासिक हा फोन लवकरच बाजारातून हद्दपार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याचबरोबर कंपनीही नफ्यासाठी अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीचा स्वीकार करणार असून लवकरच दोन नवीन अँड्रॉइड फोन बाजारात आणण्याचा कंपनीचा विचार असल्याचे समजते. याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी तंत्र वर्तुळात यासंदर्भातील जोरदार चर्चा सुरू आहे.

ऑपरेटिंग प्रणाली

२०१० नंतर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप बाजारात आले आणि फोन वापरण्याची संकल्पनाच बदलली. त्यावेळेस ब्लॅकबेरी आणि नोकियाच्या ऑपरेटिंग प्रणालीवर आधारीत स्मार्टफोनची विक्री ७० टक्के इतकी होती. तेव्हा अँड्रॉइड, विंडोज आणि आयओएस या ऑपरेटिंग प्रणाली अगदी बाल्यावस्थेत होत्या. मात्र आज याच तीन ऑपरेटिंग प्रणालींचे ९९.५ टक्के फोन बाजारात विकले जात आहेत.

नक्की काय होणार?

  • ब्लॅकबेरी आणि सिम्बियन या दोन ऑपरेटिंग प्रणालींच्या वापरकर्त्यांची संख्या कमी असली तरी अँड्रॉइड २.१ व २.२ आणि विंडोज ७.१ वापरकर्त्यांची संख्या काही लाखांमध्ये आहे. यामुळे या वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक वापरण्यासाठी लवकरच आपला फोन बदलावा लागणार आहे.
  • भविष्यात या अ‍ॅपमध्ये होणाऱ्या सुधारणा आणि सुविधांचा लाभ वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वरील ऑपरेटिंग प्रणाली दुबळय़ा ठरणार आहेत. यामुळे कंपनीने डिसेंबर २०१६नंतर या ऑपरेटिंग प्रणालींवर अ‍ॅपसाठीचा कोणताही ‘सपोर्ट’ पुरविला जाणार नसल्याचे ब्लॉगवरून जाहीर केले आहे. मोबाइल वापरकर्ते हे अँड्रॉइड आणि आयओएसला सर्वाधिक पसंती देत आहेत.

ऑपरेटिंग प्रणालीनिहाय भारतीय स्मार्टफोन वापरकर्ते

  • अँड्रॉइड – ८९.४९ टक्के
  • आयओएस – २.८१ टक्के
  • विंडोज – २.१७ टक्के
  • सिम्बियन – १.०३ टक्के
  • सिरीज ४० (नोकिया) – ३.२५ टक्के
  • इतर – १.२५ टक्के

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2016 2:47 am

Web Title: whatsapp is dropping support for blackberry and nokia phones
Next Stories
1 पालिकेच्या सत्तेपासून आम्हाला कोण रोखणार – मुख्यमंत्री
2 औषधी वनस्पतींच्या संशोधनाचा ‘आयुष’ प्रकल्प अधांतरीच!
3 वैभव दाभोळकर,अजिंक्यकुमार पुजारी ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पध्रेचे विजेते
Just Now!
X