’नागपुरात इंधन भरल्यानंतर मुंबईकडे झेपावलेल्या हवाई रुग्णवाहिकेचे चाक हवेतच निखळले. परंतु वैमानिकाने मुंबईत हे विमान सुरक्षित उतरवले. ही हवाई रुग्णवाहिका पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून मुंबईमध्ये रुग्ण घेऊन येत होती.

’यामध्ये रुग्ण, एक नातेवाईक, डॉक्टर आणि दोन कर्मचारी होते.  वैमानिकाला इंधन कमी असल्याचे लक्षात आल्याने त्याने नागपुरात इंधन भरून मुंबईकडे उड्डाण केले. परंतु, काही क्षणात विमानाचे चाक निखळले. त्यामुळे दिशानिर्देशानुसार आणीबाणी घोषित करण्यात आली.

’मुंबई विमानतळावर वैद्यकीय कर्मचारी, अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले. वैमानिकाने मुंबईत विमान सुरक्षित उतरवले, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रुही यांनी दिली.