22 January 2021

News Flash

एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतन कधी?

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन देण्यात आले

(संग्रहित छायाचित्र)

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन देण्यात आले. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळणार कधी?, असा सवाल एसटी कामगार संघटनांनी विचारला आहे.

कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्याप्रमाणे वेतन व भत्ते द्यावे, त्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे के ली आहे. यासंदर्भात गुरुवारी राज्यपालांना निवेदनही देण्यात आले. पुढील दोन महिन्याचे वेतन तात्काळ मिळावे, त्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी आदेश देण्याबाबत राज्यपालांकडे चर्चा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 12:24 am

Web Title: when is st employees paid two months salary abn 97
Next Stories
1 राज्यात ‘दिशा’ कायदा पुढील अधिवेशनात
2 २२ हजार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा
3 वीज देयकांची रक्कम कुलाबा आगारात पडून
Just Now!
X