‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रमात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन; उद्या जोगेश्वरीत कार्यक्रम

अर्थविकासाचा वेग रुळावर येत असताना घसरत्या महागाई दरानेही अर्थव्यवस्थेला दिलासा दिला आहे. आणि भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांची तेजीकडील घोडदौड सुरूच आहे. अशा स्थितीत भविष्यातील गुंतवणुकीबाबत धोरण काय असावे याबाबतचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थभान’च्या मंचावर जोगेश्वरीकरांना रविवारी मिळणार आहे.निमित्त आहे ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूकपर उपक्रमाचे.

अर्थसाक्षरतेचे नवे पर्व १६ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता जोगेश्वरी (पूर्व) स्थित मांगल्य मंगल कार्यालय क्र. ३, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या मागे, प्लॉट क्र. ३२, द हिंदू फ्रेंड्स सोसायटी मार्ग येथे होत आहे.

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत. या वेळी उपस्थितांना गुंतवणूकविषयक शंकांचे समाधान उपस्थित तज्ज्ञांना प्रश्न विचारून करून घेता येणार आहे.

गुंतवणूक सल्लागार आणि सनदी लेखापाल तृप्ती राणे ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयावर या वेळी मार्गदर्शन करतील. गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यातील परतावा, त्यासाठीची करमात्रा याचबरोबर भिन्न वयोगटातील गुंतवणूक व मिळकतीचे धोरणही विषद करतील. तर आर्थिक नियोजनकार सुयोग काळे हे ‘समभाग आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक’ या विषयाद्वारे भांडवली बाजार व म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा संबंध स्पष्ट करतील. तसेच फंडांचे विविध प्रकार, निरनिराळ्या क्षेत्रांचा त्यावरील परिणाम, त्याची भांडवली बाजाराच्या हालचालींशी असलेली सांगड आदी सोदाहरणासह अधिक स्पष्ट करतील. शेअर बाजारासह विविध पर्यायांमध्ये गुंतवणुकीचा योग्य मार्ग जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहे.

वक्ते

तृप्ती राणे :

अर्थ नियोजनाचा श्रीगणेशा

सुयोग काळे : समभाग आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

कधी?

रविवार, १६ डिसेंबर २०१८ सकाळी १०.३० वाजता

कुठे?

मांगल्य मंगल कार्यालय क्र. ३, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या मागे, प्लॉट क्र. ३२, द हिंदू फ्रेंड्स सोसायटी मार्ग, जोगेश्वरी (पूर्व)