पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा २९,५७२ मतांनी पराभव केला. निवडणुकीआधी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि भाजपाच्या वनगांना शिवसेनेने उमदेवारी दिली तर काँग्रेसचे राजेंद्र गावित हे शेवटच्या क्षणी भाजपात दाखल झाले आणि उमेदवारी मिळवण्यातही यशस्वी झाले. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर येथे पोटनिवडणूक लागली होती. जाणून घेऊयात कोण आहेत राजेंद्र गावित..

काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित हे मुळचे नंदूरबारचे आहेत. ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री होते. यापूर्वीही ते पालघर मतदारसंघातून एकदा निवडणूक जिंकले आहेत. परंतु, २०१४ मध्ये लोकसभा आणि २०१६ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.

former Congress corporators mumbai
मुंबई : काँग्रेसच्या आणखी तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश, सुषमा विनोद शेखर यांची काँग्रेसला सोडचिट्ठी
sharad pawar
‘गोविंदबागे’त जेवायला या! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण!
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
Basavaraj Patil
बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?

निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात सहभागी झाले. काँग्रेसकडून सातत्याने होत असलेल्या अपमानाला कंटाळून आपण पक्ष सोडल्याचे गावित यांनी वारंवार सांगितले आहे. पक्षासाठी योगदान देऊनही ही वागणूक दिल्याने आपण भाजपात आल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, राजेंद्र गावित यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती ८ कोटी ७७ लाख ५० हजार ३७९ रुपये इतकी दाखवली होती. गावित यांनी २०१६ला काँग्रेसमधून आमदारकीची पोटनिवडणूक लढविताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती ६ कोटी ५३ लाख ३५ हजार ४९३ रुपये इतकी होती. गेल्या दोन वर्षांत गावित यांची संपत्ती २ कोटी २४ लाख १४ हजार ८८६ रुपयांनी वाढली आहे. गावित हे २०१४ला आमदार असताना त्यांची संपत्ती ५ कोटी ३७ लाख २३ हजार १११ रुपये होती. मात्र २०१६ला त्यांनी भरलेल्या पोटनिवडणुकीच्या अर्जात त्यांची संपत्ती ६ कोटी ५३ लाख ३५ हजार ४९३ इतकी झाली म्हणजेच या दोन वर्षांच्या फरकात त्यांच्या संपत्तीत १ कोटी १६ लाख १२ हजार ३८२ रुपयांची वाढ झाली.