राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

मॅगीबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा निर्णय कोणाच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
तीन प्रयोगशाळांमघ्ये मॅगीच्या नमुन्यांमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. तरीही बापट यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचे जाहीर केले.
बाबा रामदेव यांच्या पातांजली उद्योगाला मदत व्हावी या उद्देशाने बापट यांनी मॅगीच्या विरोधात भूमिका घेतली का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. बाबा रामदेव यांच्या उद्योग समूहाने मॅगीच्या धर्तीवरच पदार्थ बाजारात आणला आहे. याच्या मदतीसाठीच राज्य सरकार मॅगीला विरोध करत आहे का, असे प्रश्नचिन्ह मलिक यांनी उपस्थित केले आहे.