News Flash

‘कोस्टल रोडला शिवसेनेचा विरोध आहे का?’

किनारपट्टी मार्गाला शिवसेनेचा विरोध आहे का? असा सवाल करत या प्रकल्पाबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार

आशीष शेलार यांचा सवाल

किनारपट्टी मार्गाला शिवसेनेचा विरोध आहे का? असा सवाल करत या प्रकल्पाबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी केली. त्याचबरोबर स्थायी समितीत (स्टँडिंग कमिटी) तडजोड न झाल्यामुळे किनारपट्टी मार्ग प्रकल्पात सल्लागार नेमण्यास विरोध होत आहे का? असा खोचक प्रश्नही त्यांनी शिवसेनेला उद्देशून केला.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या किनारपट्टी मार्गाच्या प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस आणि बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक या टप्प्यासाठी किनारपट्टी मार्गाला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यास विरोध करत ती नेमणूक रद्द करण्याची मागणी करणारा प्रस्ताव बुधवारी शिवसेनेने महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत दफ्तरी दाखल केला. त्यावरून मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मदतीने मुंबईकरांसाठी आवश्यक असणाऱ्या या किनारपट्टी मार्गासाठी वेगवेगळ्या १७ परवानग्या मिळविल्या. आता या प्रकल्पासाठीचा सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर केला मात्र स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेने विरोध केला. स्टँडिंग कमिटीतली तडजोड न झाल्यामुळे हा विरोध होत आहे का? की मुंबईकरांना सुखसुविधा देण्यास शिवसेनेचा विरोध आहे? याबाबत शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:12 am

Web Title: why shiv sena opposing coastal road project says ashish shelar
Next Stories
1 आम्ही मुंबईकर : व्रतस्थ तरुणांची चाळ
2 रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक
3 बेकायदा बांधकामांमध्ये राहणारे सगळेच गरीब?
Just Now!
X