दोन दिवसांपूर्वी मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबई महापालिकेच्या कामांची पोलखोल केली. नेहमीप्रमाणे सखलभाग जलमय झाले. दोन-तीन तासांच्या जोरदार पावसानंतर मुंबईला ब्रेक लागतो. यावेळी सुद्धा तसचं झालं. रस्ते, रुळावर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने लोकांचं मोठ आर्थिक नुकसान झालं आहे.

हिंदामाता परिसरातील व्यापाऱ्यांना तिसरा तडाखा बसला. आधी लॉकडाउन त्यानंतर ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाचे पाणी दुकानात शिरले होते आणि दोन दिवसांपूर्वी सुद्धा पावसाचे पाणी दुकानात शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- तुम्हाला शिकायचंय म्हणून आम्हाला ‘गिनी पिग’ बनवू नका; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

“रस्त्यात खड्डे, पावसाळ्यात घरात पाणी,कचऱ्याच साम्राज्य, मनपा शाळेचा बोजवारा, रुग्णालयाची दुरवस्था कुठलीच सेवा देणार नसाल तर टॅक्स का भरायचा?तुमचे खिसे भरायला?की मनपा च्या F. D वाढवयाला?” असे टि्वट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

आणखी वाचा- मुंबईची झाली तुंबई, खरंच त्यांनी करुन दाखवलं; दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

तुम्हाला शिकायचंय म्हणून आम्हाला ‘गिनी पिग’ बनवू नका
“सरकारडे ना करोनाचं नियोजन आहे ना मुंबईचं. २५ वर्षे शिवसेना सत्तेत आहे आणि दरवर्षी हीच गोष्ट घडते. यातून आम्ही शिकलो असं मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य ऐकलं. तुम्हाला शिकायचंय म्हणून आम्हाला गिनी पिग बनवू नका,” असं म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.