पुणे येथील २२ वर्षांच्या तरुणीची कथित आत्महत्या व तिचे राजकीय नेत्याशी असलेल्या कथित संबंधांच्या प्रकरणी पुरेसा पुरावा असतानाही गुन्हा का दाखल केला नाही?, अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारला केली. तसेच या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणी फौजदारी जनहित याचिका केली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती एस. पी. देशमुख आणि न्या. गिरीश देशमुख यांच्या खंडपीठासमोर वाघ यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी या तरुणीच्या कथित आत्महत्येप्रकरणी पुरावे असूनही पोलिसांकडून अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे वाघ यांच्या वतीने अ‍ॅड्. अतुल दामले यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणी नेमका काय पुरावा आहे हेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

वाघ यांना अशी मागणी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी केला. मात्र याचिके त उपस्थित मुद्द्यांची न्यायालयाने दखल घेत या प्रकरणी पुरावा असताना गुन्हा दाखल का केला नाही?, अशी विचारणा सरकारला के ली. तसेच सरकारला याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.