27 May 2020

News Flash

वाहतूक बंद असताना टोलबंदी कशाला?

शासनाला करोडो रुपयांचा भुर्दंड

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पथकर तात्पुरता रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घेतला असला तरी त्यामुळे पथकर कंत्राटदारांचा लाभ होणार असून शासनाला करोडो रुपयांचा भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे यासंदर्भात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली असून राज्यातील रस्त्यांबाबत असा निर्णय न घेण्याची विनंती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिवांना करण्यात आली आहे.

करोनामुळे देशभरात टाळेबंदी असल्याने राष्ट्रीय महामार्गावर तूर्तास पथकर रद्द करण्याचा निर्णय गडकरी यांनी घेतला आहे. मुंबई-पुणे पथकर आकारणीविरोधात उच्च न्यायालय का दाद मागितलेले सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी गडकरी यांना हा निर्णय रद्द करण्याची विनंती केली आहे. सध्या वाहतूक थंडावल्याने पथकर नाक्यांवर अजिबात गर्दी नाही. रुग्णवाहिकांना पथकर नाही. सध्या पथकर रद्द केल्यास शासनाला कंत्राटदाराला भरपाई द्यावी लागेल किं वा वसुलीची मुदत वाढवून द्यावी लागेल. त्याचा करोडोंचा भरुदड शासनास पडेल. टाळेबंदीमुळे हजारो उद्योगांना आर्थिक फटका बसत असताना पथकर कंत्राटदारांना सवलत कशासाठी, असा सवाल वाटेगावकर यांनी केला आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयास हस्तक्षेपाची विनंती केली आहे.

केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने ही मुंबई-पुणे आणि राज्यभरातील अन्य रस्त्यांबाबत हा निर्णय घेऊ नये, अशीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 1:25 am

Web Title: why toll off when traffic is closed abn 97
Next Stories
1 शेतकऱ्यांना सवलतीत अन्नधान्य – भुजबळ
2 भाजपच्या वतीने दररोज २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य, भोजन
3 सिद्धिविनायक न्यास रक्तदानासाठी तुमच्या दारी
Just Now!
X