News Flash

करोनाला हरवायचं असेल तर चला हवा येऊ द्या!-उद्धव ठाकरे

एसी बंद करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

करोनाला हरवायचं असेल तर चला हवा येऊ द्या!-उद्धव ठाकरे

करोनाला हरवायचं असेल तर चला हवा येऊ द्या असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हे आवाहन करण्यामागे एक खास कारण आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्राकडून आलेले निर्देश सांगितले. “घरांमधील एसी बंद ठेवण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. हे तर आम्ही आधीच सुरु केलं आहे. करोना पसरु द्यायचा नसेल तर घरातली दारं खिडक्या उघडा आणि चला हवा येऊ द्या.” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, किराणा, भाजीपाला, वैद्यकीय सेवा बंद करणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. आपला महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हा महाराष्ट्र भगवा झालेला असतो. मात्र आज महाराष्ट्र शांत आहे. हरकत नाही करोनाशी दोन हात करुन आपण ही लढाई जिंकू आणि त्यानंतर विजयाची गुढी उभारु ही लढाई आपण जिंकणारच आहोत असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 1:27 pm

Web Title: why uddhav thackeray says chala hava yeu dya scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना व्हायरस हा छुपा शत्रू, त्याला हरवण्याचा संकल्प करा : उद्धव ठाकरे
2 लोकसत्ताचा ई-पेपर वाचा एका क्लिकवर…
3 Video : चापेकर बंधुंचा मुंबईशी निगडीत पराक्रम…
Just Now!
X