दाम्पत्याकडून अनेकांना गंडा; शेतात पुरलेला मृतदेह हस्तगत

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या हत्याकांडाची उकल काशिमीरा पोलिसांनी के ली. आर्थिक गंडा घालून अटक टाळणाऱ्या दाम्पत्यात आर्थिक वाद सुरू झाले. पत्नीने पैशांसाठी तगादा लावताच पतीने तिची हत्या के ली. शेतात मृतदेह पुरून त्यावर कापूस पिकवला. पत्नी जिवंत आहे हे भासवण्यासाठी तिच्या मोबाइलवरून नातेवाईकांशी संवादही साधला. एक वर्षांने पतीला अटक होताच या हत्याकांडाला वाचा फु टली.

निकिता दोशी-उकाणी असे मृत विवाहितेचे नाव आहे. पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिची आशीष उकाणी या विवाहित व्यापाऱ्यासोबत फे सबुकद्वारे ओळख झाली. काही महिने ‘लीव्ह इन’मध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न के ले. लोकांना आर्थिक गंडा घालण्यात आशीष सराईत असल्याची कुणकुण निकिताला लागली आणि तिने त्याला साथही दिली. २०१८मध्ये ट्रान्समार्ट डिजिटल कं पनीला १६ लाख रुपयांचा गंडा घातल्यावर दोघे पसार झाले. अखेर दोन आठवडय़ांपूर्वी काशिमीरा पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय हजारे, सहायक निरीक्षक राजेंद्र चंदनकर यांनी आशीषला सुरत येथून अटक के लीच. गुन्ह्य़ात सहभाग असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे निकिताबाबत चौकशी के ली. ती आपल्यासोबत राहात नाही, असे सांगत आशीषने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न के ला. मात्र पोलिसांनी आपल्यापरीने चौकशी सुरू करताच निकिताची हत्या करून गुजरातच्या अमरेली येथील शेतात पुरल्याची कबुली आशीषने दिली.

हे दाम्पत्य पोलिसांपासून लपतछपत असले तरी ऐशोआरामात जगत होते. निकिताने काही वेळेस आपल्या नातेवाईकांकडून, ओळखीतल्या व्यक्तींकडून पैसेही मागवले होते. तिने हेक्सा कार विकत घेतली. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात निकिता आणि आशीष यांच्यात पैशांवरून वाद सुरू झाले. निकिताने पैशांसाठी आशीषमागे तगादा लावला. तेव्हा त्याने निकिताचा काटा काढण्याचे ठरवले. १५ ऑक्टोबरला दोघांनी भरपूर मद्य घेतले. मद्याच्या अमलात आशीषने निकिताला विहिरीत ढकलले. त्यानंतर मृतदेह विहिरीबाहेर काढून शेतात पुरला आणि त्यावर कापूस पेरला.

हत्येनंतर निकिताचा मोबाइल आशीष मुद्दामहून वापरत असे. अधूनमधून तो तिच्या नातेवाईकांशी निकिता म्हणून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संवाद साधे. मात्र निकिताच्या वहिनीच्या मनात शंके ची पाल चुकचुकली होती. निकिता आपल्याशी व्हॉट्सअ‍ॅपद्वारेच का बोलते, फोन का करत नाही, असा प्रश्न तिला पडला. खातरजमा करण्यासाठी तिने मुद्दामहून दूरच्या नातेवाईकांबाबत विचारलेल्या प्रश्नावर चुकीची उत्तरे मिळाल्यावर तिचा संशय बळावला आणि तिने काशिमीरा पोलीस ठाण्यात निकिता बेपत्ता असल्याची तक्रोर दिली.

अमरेली येथील शेतातून कु जलेला मृतदेह हस्तगत करण्यात आला. चाचणीसाठी तो गुजरातच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. काशिमीरा पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुजरात पोलिसांनी आशीषविरोधात निकिताच्या हत्येचा गुन्हा नोंदवला, असे हजारे यांनी स्पष्ट के ले. आशीष, निकिताने मैत्री डॉट कॉम नावाची कं पनी स्थापन के ली. आर्थिक व्यवहारांसाठी त्यांनी ट्रान्समार्ट डिजिटल कं पनीकडून कार्ड स्वाइप करणारी चार ‘पॉइंट ऑफ सेल’(पीओएस) यंत्रे विकत घेतली. अन्य एका साथीदाराच्या क्रेडिट कार्डची मर्यादा ३० हजारांवरून १६ लाखांपर्यंत वाढवून घेतली. एका आठवडय़ाच्या आत त्यांनी या कार्डद्वारे १६ लाख रुपये स्वत:च्या खात्यावर घेतले आणि पळ काढला.