News Flash

उरणमध्ये २२ जणांना मधमाशांचा चावा

येथील महाजनकोच्या वायुविद्युत केंद्रात मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात एका कार्यकारी अभियंत्यासह २२ प्रशिक्षणार्थी अभियंते जखमी झाले.

| October 12, 2014 06:48 am

येथील महाजनकोच्या वायुविद्युत केंद्रात मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात एका कार्यकारी अभियंत्यासह २२ प्रशिक्षणार्थी अभियंते जखमी झाले. त्यांच्यावर उरणमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्य़ांतील साहाय्यक अभियंत्यांची भरती महाजनकोमध्ये करण्यात आलेली आहे. यांपैकी नाशिक येथून भरती झालेले २२ प्रशिक्षणार्थी उरणच्या वायुविद्युत केंद्रात प्रशिक्षण घेत होते. वायुविद्युत केंद्रातील पन्नास ते साठ फूट उंचीवर असलेल्या वेस्ट हिट रिकव्हरी प्लांटची माहिती घेत असताना अचानकपणे मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना तातडीने या प्रशिक्षणार्थीना उपचारासाठी उरणच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या माश्यांच्या हल्ल्यात महिला प्रशिक्षणार्थीही जखमी झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 6:48 am

Web Title: wild bee stings 22 in uran
Next Stories
1 निवृत्त अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई
2 विभक्त पत्नी पतीविरोधात तक्रार करू शकत नाही!
3 संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये लक्षणीय वाढ
Just Now!
X